Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हुंबरळी शाळेस कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा

पाटण / प्रतिनिधी : हुंबरळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच शिक्षकावर 18 विद्यार

धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड; राष्ट्रवादी कार्यकर्ते महाडीक यांच्या संपर्कात
दिग्गज कलाकारांच्या अदाकारीने शुक्रवारी रंगणार औंध संगीत महोत्सव
सातारा जिल्ह्यात 8 पैकी 8 जागांवर महायुती विजयी: महाविकास आघाडीचा धक्कादायक पध्दतीने सुफडा साफ

पाटण / प्रतिनिधी : हुंबरळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच शिक्षकावर 18 विद्यार्थ्यांचा भार पडत आहे. येत्या मंगळवारपासून कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास बुधवारी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा हुंबरळी ग्रामस्थांनी दिला आहे.
कोयना विभागातील हुंबरळी येथे सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत एकूण 18 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका शिक्षकांवरच सर्व वर्गांचा भार आहे. मात्र, विद्यार्थीची पट संख्या लक्षात घेता या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक होणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामस्थांनी सबंधित विभागाकडे वेळोवेळी मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही कार्यवाही झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यात कमी पट असलेल्या अनेक शाळांता जादा शिक्षक आहेत. यातील एखाद्या शिक्षकाची या ठिकाणी सोमवार ते मंगळवारपर्यंत तातडीने शिक्षण विभागाने कायमस्वरूपी नियुक्ती करावी. अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता मंगळवारपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास बुधवारी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

COMMENTS