मुंबई | अक्षय कुमारची आई अरूणा भाटिया यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. अरूणा भाटिया या 77 वर्षांच्या होत्या आपल्या आईच्या निधनाने अक्षय सध्या द
मुंबई | अक्षय कुमारची आई अरूणा भाटिया यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. अरूणा भाटिया या 77 वर्षांच्या होत्या आपल्या आईच्या निधनाने अक्षय सध्या दु:खात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षयच्या दु:खात सहभागी होत सांत्वनपर पत्र लिहिलं आहे.
पत्रात काय लिहल आहे.
जर मला तुला हे पत्र लिहावं लागलं नसतं तर किती चांगलं झालं असतं. आई अरूणा भाटिया यांच्या निधनाच्या वार्ता ऐकून खूप दु:ख झालं. जेव्हा सकाळी फोनवर बोललो तेव्हा तु खूप दु:खी होतास. आई तुझ्यासाठी सर्वस्व होती, असं तु लिहिलं होतं. तुझ्या आई तुझ्यामागे खंबीरपणे उभी होती. आता तू स्वत:ला सावर, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला धीर दिला आहे.
अक्षयने दिलेला प्रतिसाद
अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहलेलं पत्र त्याच्या इंन्स्टाग्रामवरून शेअर केलं आहे. अक्षय पत्र शेअर करताना लिहितो की, आईच्या निधनाबद्दल तुम्ही सर्वांनीं पाठवलेल्या शोक संदेशाबद्दल मी विनम्रपणे सर्वांचा आभारी आहे. तुमचा वेळ काढत माझ्या दिवगंत पालकांबद्दल उबदार भावना प्रकट करण्यासाठी माननीय पंतप्रधानांचे आभार. आपले हे सांत्वनदायक शब्द माझ्या कायम सोबत राहतील. जय आंबे, असं अक्षयने इंन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.
दरम्यान, अक्षयने त्याची आई अरूणा भाटिया यांच्या निधनाची बातमी दिली होती. माझी आई माझा कणा होती, तिच्या जाण्याने मला माझ्या अंतकरणात प्रचंड वेदना होत आहेत. माझ्या आईने जगाचा निरोप घेतला आहे, ती माझ्या वडिलांकडे गेली आहे, असं म्हणत अक्षयने सर्वांच्या प्रार्थनांचा आदर करत ओम शांती असं लिहलं होतं.
COMMENTS