परतीच्या पावसाला सुरुवात… हवामान विभागाने केले जाहीर…

Homeताज्या बातम्यादेश

परतीच्या पावसाला सुरुवात… हवामान विभागाने केले जाहीर…

प्रतिनिधी : मुंबई यंदा 13 जुलै रोजी राजस्तानसह संपूर्ण भारत मान्सूनने व्यापला होता. सुमारे 2 महिने 24 दिवस या भागात मान्सूनने मुक्काम केल्यानंतर म

मोदींनी भाजपची कमान हाती घेतल्यापासून पक्षाने मागे वळून पाहिले नाही… अमित शहांची स्तुतीसुमने
Yogi Adityanath : “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही” (Video)
दहशतवाद्यांनो…! हिंमत असेल तर समोर या (Video)

प्रतिनिधी : मुंबई

यंदा 13 जुलै रोजी राजस्तानसह संपूर्ण भारत मान्सूनने व्यापला होता. सुमारे 2 महिने 24 दिवस या भागात मान्सूनने मुक्काम केल्यानंतर माघारीची वाट धरली आहे. 

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार 17 सप्टेंबर ही मान्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. 

यंदा तब्बल 19 दिवस उशिराने मान्सून वारे माघारी फिरले आहेत. पश्चिम राजस्तान आणि लगतच्या गुजरातमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. 

आर्द्रतेची टक्केवारी कमी झाली आहे. तसेच या भागात वार्‍यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे तयार झाल्याने मान्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

पश्चिम राजस्तान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून काल मान्सून परतला. बिकानेर, जोधपूर, जालोर आणि भूजपर्यंत मान्सूनने माघार घेतली.

नैऋत्य मोसमी वार्‍यांनी (मान्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी राजस्तान आणि गुजरातच्या काही भागातून मान्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने दिले.

COMMENTS