Homeताज्या बातम्यादेश

अदानी आणि मोदी दोघे एकच

काँगे्रसच्या अधिवेशनात राहुल गांधींचा हल्लाबोल

रायपूर/वृत्तसंस्था ः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींना मी लोकसभेत तुमचे अदानींशी नाते काय, एवढाच सवाल मी उपस्थित केला होता. या प

बेकायदेशीर वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण अटकेत
जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये रंगला दांडिया व गरबा नृत्य
जिल्हा परिषदेच्या 10 शाळा खोल्यांना 1.20 कोटी निधी मंजूर

रायपूर/वृत्तसंस्था ः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींना मी लोकसभेत तुमचे अदानींशी नाते काय, एवढाच सवाल मी उपस्थित केला होता. या प्रश्‍नांचे उत्तर त्यांनी होकारात्मक किंवा नकारात्मक देणे अपेक्षित होते. मात्र उत्तर तर सोडा, याउलट पंतप्रधान मोदींना प्रश्‍न विचारताच, केंद्रातील सर्व मंत्री, भाजपाचे खासदार अदानींच्या बचावासाठी उभे राहिले. मोदींचे अदानींशी नाते आहे. अदानी आणि मोदी एकच आहेत. देशाची सगळी संपत्ती एका व्यक्तीने लुटली आहे, असा घणाघाती टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी रायपूरमधील काँग्रेसच्या महाअधिवेशनात केली.
देशात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात येऊन देशाची संपत्ती लुटली, आता अदानी हेच करत आहेत. अदानी समुहावर टीका करणार्‍यांना भाजपा देशद्रोही ठरवत आहेत. मग, अदानी सर्वात मोठे देशभक्त आहेत? भाजपा-संघ अदानींना बचाव का करत आहेत? अदानींच्या बेनामी कंपन्यांमार्फत हजारो कोटींचा पैसा भारतात आणला जातो. अदानी समूह संरक्षण क्षेत्रात काम करतो, मग मोदींना त्यांच्या बेनामी कंपन्यांची माहिती नाही? ही देशाच्या सुरक्षेशी निगडीत गंभीर बाब असताना संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी का केली जात नाही, असा प्रश्‍नांचा भडिमार करत राहुल गांधींनी, अदानी प्रकरणातील सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही महाअधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी दिला. केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या चीनसंदर्भातील विधानांचेही राहुल गांधींनी वाभाडे काढले. चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी असल्याने भारताला चीनविरोधात लढता येत नाही, असे विधान जयशंकर यांनी मुलाखतीत केले होते. त्यावर, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था मोठी असेल तर त्याविरोधात लढायचे नाही का? मग, इंग्रजांविरोधातही आपल्याला लढता आले नसते? मोदी सरकारमधील मंत्रीच म्हणतात, भारत चीनविरोधात लढू शकत नाही. हा तर भ्याडपणा झाला. हीच का मोदी सरकारच्या मंत्र्यांची देशभक्ती? ताकदवानासमोर मान तुकवायची आणि कमकुवत असलेल्यांशी लढायचे, ही तर सावरकरांची विचारसरणी झाली! महात्मा गांधींनी ‘सत्याग्रहा’चा मार्ग दाखवला होता, भाजपा-संघ तर ‘सत्ताग्रही’ आहेत, ते सत्तेसाठी काहीही करू शकतील, चीनशी हातमिळवणी करू शकतील, त्यांच्यापुढे वाकतील, अशी तीव्र टीका राहुल गांधींनी केली.

अरुणाचल ते गुजरात भारत जोडो यात्रा काढणार – भारत जोडो यात्रे’नंतर आता काँग्रेस देशाच्या पूर्व भागातून पश्‍चिम भागापर्यंत यात्रा काढण्याचा विचार करत आहे, जी अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदर दरम्यान होण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेसकडून संकेत देण्यात आले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची तपश्‍चर्या पुढे नेण्यासाठी कार्यक्रम तयार करावा, ज्यात सहभागी होण्यासाठी सर्वजण तयार आहेत. राहुल यांनी आपल्या प्रवासाला अनेक प्रसंगी तपश्‍चर्या असे नाव दिले आहे.

COMMENTS