Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उशीरा रात्री पिझ्झा न दिल्याने हॉटेलचालकाला मारहाण

पुणे ः पुणे शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. कोयता गँग, रस्त्यांवर होणारे हल्ले यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पुण्यात गुन्हे

खंबाटकी घाटातील नवा बोगदा अंतिम खुदाईद्वारे खुला करण्यास प्रारंभ; पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार कमी
विठ्ठल भुसारी यांची मंत्रालयात लिपिकपदी निवड
अखेर आव्हाडांनी केला खेद व्यक्त

पुणे ः पुणे शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. कोयता गँग, रस्त्यांवर होणारे हल्ले यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पुण्यात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. त्या गुन्हेगारांना वर्दीची भीतीच वाटत नाही. यामुळे छोट्या छोट्या कारणावरुन मारहाण आणि हल्ला करण्याच्या घटना घडत आहे. आता पुण्यात एका हॉटेल चालकास दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील खराडी भागत रात्री दीड वाजता हा प्रकार घडला आहे. हॉटेल बंद करुन हॉटेल मालक जात होतो. परंतु चौघांनी पिझ्झाची मागणी केली. त्यांना पिझ्झा दिला नाही. यामुळे त्यांनी दगडाने मारहाण केली. पुणे येथील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये रात्री दीड वाजता अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव गेले. त्यांनी त्या ठिकाणी पिझ्झा देण्याची मागणी केली. परंतु हॉटेलचा मालक हॉटेल बंद करुन निघाला होता. त्यानंतर हे चौघांनी मागणी लावून धरली. परंतु हॉटेल मालकाने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरून थेट हॉटेल मालकाला मारहाण केली. हॉटेलचालकाला दगडाने मारहाण केल्यामुळे तो जखमी झाला. या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS