Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनामनात श्रीराम भक्तीची ज्योत पेटवा – प्रदीप महाराज नलावडे

श्रीराम साधना आश्रमामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव साजरा

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील मुकींदपूर येथील रामनगरच्या श्रीराम साधना आश्रमामध्ये संत महंतांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करत प्रभू श्र

शिक्षण उत्पादक हस्तकलेतून किंवा उद्योगातून दिले जावेः आदिनाथ सुतार
अमृतवाहिनीच्या 72 विद्यार्थ्यांना अमृत मेरीटोरीयस स्कॉलरशिप
हंडीनिमगावमध्ये ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील मुकींदपूर येथील रामनगरच्या श्रीराम साधना आश्रमामध्ये संत महंतांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करत प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.प्रभू रामचंद्रांचे अवतार कार्य हे धर्माच्या उत्कर्षासाठी व रक्षणासाठी असल्याने  श्रीरामभक्तीची ज्योत मनामनात पेटवा असे आवाहन शिवचरित्र कथाकार हभप प्रदीप महाराज नलावडे यांनी श्रीरामनवमीच्या निमित्ताने झालेल्या कीर्तन सोहळयात बोलतांना केले.
       यावेळी श्रीराम साधना आश्रमात झालेल्या रामनवमीच्या झालेल्या कीर्तन प्रसंगी हभप शिवचरित्रकार प्रदीप महाराज नलावडे यांनी प्रभू रामचंद्रांचे जीवन त्यांच्या जन्मोत्सवाचा प्रसंग कीर्तनातून बोलतांना व्यक्त केला.यावेळी झालेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळयाच्या प्रसंगी श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरीजी महाराज, महंत गोपालानंदगिरीजी महाराज, महंत ऋषिनाथजी महाराज,महंत सूरदासजी महाराज,साध्वी सुवर्णांनंद महाराज चैतन्य,महंत सिध्दनाथ महाराज यांच्यासह युवा नेते उदयनदादा गडाख उपस्थित होते.यावेळी उपस्थित संत महंतांच्या हस्ते पाळण्याच्या दोरी ओढून पुष्पवृष्टी करून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.झालेल्या जन्मोत्सव प्रसंगी आदर्श शिक्षिका सुप्रिया झिंजुर्डे व सीमंतिनी बोर्डे यांनी श्रीराम जन्माचा पाळणा म्हटला. प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम साधना आश्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवचरित्र कथा तसेच कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता  यावेळी सोहळयासाठी योगदान देणार्‍या भाविकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.युवा नेते उदयनदादा गडाख यांनी श्रीराम भक्तांना आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने श्रीरामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या कीर्तन महोत्सवासह शिव चरित्र कथेसाठी आमदार शंकरराव गडाख यांनी सर्वात जास्त तीन लाखाची देणगी दिल्याबद्दल संत महंतांच्या हस्ते युवा नेते उदयन दादा गडाख यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या कीर्तन प्रसंगी अमितराजे भोसले, राऊत साहेब, हभप ज्ञानेश्‍वर महाराज हजारे, हभप चावरे महाराज, पोपट महाराज निपुंगे, लक्ष्मीनारायण जोंधळे, दत्ताभाऊ कांगुणे, भिवाजीराव आघाव, संतोष काळे, पी.आर. जाधव यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित हजारो भाविकांना यावेळी शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले.

COMMENTS