अहमदनगर प्रतिनिधी - शाळेतून घरी जाणार्या अल्पवयीन मुलीचा हात धरून छेड काढणार्या तरुणाविरुध्द येथील कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कल

अहमदनगर प्रतिनिधी – शाळेतून घरी जाणार्या अल्पवयीन मुलीचा हात धरून छेड काढणार्या तरुणाविरुध्द येथील कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने (वय 13) फिर्याद दिली आहे. गुरुवारी सायंकाळी नगर शहरात ही घटना घडली. लहानु विजु चित्राल (रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी मुलगी नगर शहरातील एका शाळेत शिक्षण घेते. तिची शाळा सुटल्यानंतर ती तिच्या भावासोबत घरी जात असते. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर फिर्यादी मुलगी भावासोबत घरी जाण्यासाठी निघाली असता एक अनोळखी तरुण तिच्यासमोर आला व तिचा हात धरला. तू माझ्यासोबत येते का, असे म्हणून मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला असता तेथे नागरिक जमा झाले. त्यांनी या तरुणाला पकडले. काही वेळातच मुलीची आजी व वडील तेथे आले. घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला पोलिस ठाण्यात आणले. मुलीची फिर्याद नोंदवून घेतली. या तरुणाने त्याचे नाव लहानु विजु चित्राल असे सांगितले आहे. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
छेडछाडीची ही घटना नगर शहरातील गुजर गल्ली येथील दीपक आर्ट प्रेससमोर गुरुवार दिनांक एक डिसेंबर रोजी घडली. तेंव्हा तिने घाबरुन आरडा ओरडा केल्यावर त्या ठिकाणी लोक जमा झाले. त्यांनी त्या व्यक्तीस पकडले व त्यानंतर त्यातील काही लोकांनी ही घटना तिच्या आज्जीस सांगितली. तेंव्हा तिची आज्जी व वडील त्या ठिकाणी आले. त्यानंतर पोलिस तेथे आले. भररस्त्यात व गर्दीच्या वेळी अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.
COMMENTS