नवी दिल्ली ः कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केले जात असून, कॅनडाच्या सरे प्रांतातील प्रसिद्ध अशा लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुम

नवी दिल्ली ः कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केले जात असून, कॅनडाच्या सरे प्रांतातील प्रसिद्ध अशा लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात घरावर 14 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आला. गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करणे, साक्षीदारांचे जबाब नोंदविणे आणि सीसीटीव्ही चित्रण गोळा करण्याचे काम सुरू आहे.
COMMENTS