Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार

मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते हसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलावार असून, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळ

…तर, कर्मवीरांच्या शिक्षणरुपी वटवृक्षाला सुवर्णफळ लागेल : डॉ. सागर देशपांडे
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला न्यायालयात आव्हान
सशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते हसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलावार असून, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कागल येथील साखर कारखाण्यात घोटाळा केल्याचा हसन  मुश्रीफ यांच्यावर आरोप आहे.  मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
जामीन अर्जाच्या निकालापर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण होते. मात्र ते संरक्षण आता संपले आहे. साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या पुण्यातील व्यावसायिकांवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने छापेमारी देखील केली होती. ईडीने पुणे शहरातील नऊ ठिकाणी छापे टाकले होते. हडपसरला, गणेशपेठ, प्रभात रोड, सिंहगड रोड आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. नलावडे साखर कारखाना प्रकरणी 11 मार्च रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. मागील दोन महिन्यातील ही तिसरी छापेमारी होती. सकाळी सात वाजता ईडीचे पाच ते सहा अधिकारी कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS