शिवसेना व भाजप आमने-सामने

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना व भाजप आमने-सामने

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्यातील वातावरण तणावाचे असल्याचे दिसून येत आहे. राणा दाम्पत्य

आगरनांदुर येथे प्रति वर्षा प्रमाणे या वर्षी देखील यात्रा भरणार मोठ्या उत्साहात
आरोग्यरूपी धनसंपदा-धनत्रयोदशी
शिवसेना नेत्याच्या घरावर धाड | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्यातील वातावरण तणावाचे असल्याचे दिसून येत आहे. राणा दाम्पत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार होते. तर याला विरोध करत शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर रविवारी रात्री भाजप नेते किरीट सोमय्या यांची गाडी फोडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक पवित्रा स्वीकारला. या तणावामुळेे भाजप-शिवसेना आमने-सामने आल्याचे चित्र आहे.
रविवारी राणा दाम्पत्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीशांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्यांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर दोघांची वैद्यकीय चाचणी झाली आणि अखेर दाम्पत्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. आज तातडीने सुनावणी करण्यासाठी सुट्टीच्या कोर्टाचा पर्याय होता. त्यासाठी 12.30 नंतर सुनावणी पार पडली. त्यात राणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वांद्रे न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी सुनावणी घेतली. हे सुट्टीचे न्यायालय असून धानीवाले हे विशेष दंडाधिकारी आहेत. अ‍ॅड. रिझवान मर्चंट यांनी राणांची बाजू मांडली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं राणांच्या वकिलांनी सांगितले. यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. येत्या 29 एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. नियमित दंडाधिकार्‍यांचे कोर्ट कार्यरत झाल्यावर जामीनावर सुनावणी होणार आहे. पाच दिवसांनी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्यावर आयपीसी 153 ए नुसार कारवाई केली आहे.

धार्मिक उन्मादाद्वारे सत्ता उलथवण्याचा डाव : राऊत
राणा दाम्पत्य महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक निर्माण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर पोलिसांकडून लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम योग्यच असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक कारवाई ही कायद्यानेच होते, असे राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपला महाराष्ट्रात कोणत्याहीप्रकारे संघर्ष निर्माण करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करायची आहे. मग राज्यपाल त्यांचेच आहेत. त्यांच्यामार्फत शिफारस करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

मुंबई पोलिसांनीच मला शिवसैनिकांकडे सोपवले : सोमय्या
राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांची भेट घेऊन भाजपचे खासदार किरीट सोमय्या परतत असतांना त्यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यात त्यांच्या गाडीची काच फुटली. यावर बोलतांना सोमय्या यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. या हल्ल्यामुळे भाजप आता आक्रमक झाली आहे. किरीट सोमय्या आता या प्रकरणी नवी दिल्लीत जाऊन गृहसचिवांना तक्रार देणार आहे. तसंच, मुंबई पोलिसांनीच मला शिवसैनिकांकडे सोपवले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. ज्या प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई पोलिसांचा माफिया सारखा उपयोग करत आहेत. झेड सिक्युरिटीच्या व्यक्तीच्या जिवाशी धोका पत्करायचा काम करत असल्याचे सोमय्या म्हणाले.

COMMENTS