Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुजबळानंतर मंत्री देसाई कोरोनाबाधित

मुंबई : राज्यात कोरोनाने डोके वर काढले असून, मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण वाढत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातही कोरोनाने शिरकाव केला आहे. महाराष्ट्

जावयापाठोपाठ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यताl पहा LokNews24
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग
तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू   

मुंबई : राज्यात कोरोनाने डोके वर काढले असून, मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण वाढत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातही कोरोनाने शिरकाव केला आहे. महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे कोरोनाबाधित झाले आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. या पूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे देखील करोना बाधित झाले आहेत.
महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट आणि ट्विट करत या बाबत माहिती दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या पूर्वी छगन भुजबळ हे  कोरोनाबाधित झाले आहेत. त्यानंतर शंभुराज देसाई बाधित झाले आहे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देसाई यांनी ट्विट द्वारे केले आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच 2 हजाराहून अधिक सक्रिय करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 450 नवे रुग्ण आढळले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत रविवारी 123 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. मुंबईत सध्या 43 कोविड रुग्ण रूग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी 21 ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.

COMMENTS