Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हर्षवर्धन बोर्डे यांची वित्त आयोगाचे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती

श्रीरामपूर ः तालुक्यातील मुळचे मातुलठाण (हल्ली पुणतांबा) येथील रहिवासी असलेले हर्षवर्धन विलासराव बोर्डे यांची पंजाब सरकारने 16 व्या वित्त आयोगाचे

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर अन्याय
वृंदावन यात्रेची काल्याच्या कीर्तनाने सांगता
रेल्वे स्टेशन भागात पुन्हा पोलिस चौक सुरु करावी

श्रीरामपूर ः तालुक्यातील मुळचे मातुलठाण (हल्ली पुणतांबा) येथील रहिवासी असलेले हर्षवर्धन विलासराव बोर्डे यांची पंजाब सरकारने 16 व्या वित्त आयोगाचे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. अल्पावधित त्यांची कामगिरी बघून अर्थमंत्री हरपाल सिंह चिमा यांनी हर्षवर्धन यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव केला. हर्षवर्धन हे सी.ए.असून ते उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थ विभागात कार्यरत होते. त्यांची तेथील कामगिरी पाहून पंजाब सरकारने त्यांची राज्य आर्थिक आयोगाचे सल्लागार या महत्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.                                                        हर्षवर्धन हे स्वातंत्र्य सेनानी स्व. रामरावभाई बोर्डे यांचे पणतु तर सर्वश्री शिवाजीराव, प्रतापराव व बाळासाहेब बोर्डे यांचे नातू आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल शरदराव ताकटे, डॉ. विठ्ठलराव जाधव, अ‍ॅड. बाळासाहेब खंडागळे, विलासराव जाधव, अर्जुनराव भांड, प्रतापराव भोसले, अ‍ॅड. रविंद्र अडसुरे, सुधाकर खंडागळे, संजय भंडारे, भास्कर खंडागळे, सचिन जगताप, अ‍ॅड. लिना बोर्डे आदिंनी अभिनंदन केले आहे. 

COMMENTS