भाकडचे गाभडलेले

Homeताज्या बातम्याविशेष लेख

भाकडचे गाभडलेले

सुधाकर सोनवणे, अहमदनगर : भारत देश कृषीप्रधान देश आहे असे म्हणतात. तसे असेल तर शेतकरी आत्महत्या का करतात? भारत देश कृषी प्रधान असावा याला विरोध ना

अडीच हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
चार हत्याकांडांनी नागपूर जिल्हा हादरला l Crime Show | Lo
राज्यात होणार ऑलिम्पिक भवन

सुधाकर सोनवणे, अहमदनगर :

भारत देश कृषीप्रधान देश आहे असे म्हणतात. तसे असेल तर शेतकरी आत्महत्या का करतात? भारत देश कृषी प्रधान असावा याला विरोध नाही, पण त्यापेक्षा तो समस्या प्रधान देश आहे हे मान्यच करावे लागते. मग समस्या नेमक्या कोणत्या? तर त्या आहेत, अन्न- पाणी, वस्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, अन्याय-  अत्याचार आदी. या समस्या सर्वांच्या नक्कीच नाहीत. या समस्या ज्यांच्या नाहीत ते आणि ज्यांच्या आहेत ते, यांच्यात फरक काय आणि तो कुणी केला? हा फरक स्पष्ट केल्याशिवाय तो फरक मोडून काढता येणारा नाही. या समस्येच्या फरकाचे मूळ शोधले तर ते आहे धर्मात. मग तो धर्म कुठलाही असो. धर्मात अशा  फरकाचे प्रयोजन करण्याचे कारण काय? तर त्याचे कारण आहे सत्ता, संपत्ती, सामाजिक दर्जा हे. धर्मामध्ये सत्ता, संपत्ती, सामाजिक दर्जा हे विशिष्ट जातीच्या लोकांकडे असते. ते लोक कोण आहेत हे सांगण्याची गरज नाही आणि त्या लोकांच्या या समस्या नाहीत. बीडमधील दहीवंडी ता. शिरूर कासार येथे निस्वार्थपणे गोसेवा करणारा शब्बीर मामू आहे. त्याला त्याच्या निःस्वार्थ गोसेवेमुळे केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार बहाल केला. त्याबद्दल अजिबात तक्रार नाही. पण आदिम काळात माणसाने जेव्हा जनावरे (प्राणी) पाळायला सुरुवात केली तेव्हा ती स्वार्थी भावनेतून. गाई- बैल पाळण्याचा स्वार्थ असा होता की, बैल शेतात शेती कामाला वापरता येतो आणि गाईचे दूध काढून खाता- पिता येते. हा माणसाचा स्वार्थ आहे. नैसर्गिकरित्या गाईचे दूध हे तिच्या वासरांसाठी असते. पण माणूस ते दूध काढून पितो. ही एकप्रकारे चोरी आहे. म्हणजे, दूध पिणारा माणूस चोर आहे. हे नैसर्गिक सत्य आहे. मग प्रश्न आहे, शब्बीर मामू निस्वार्थ आहे का? यावर अनेक विद्वान असे म्हणतील की, ते गाईचे दूध काढत नाहीत. त्यांना माझे असे उत्तर आहे की, ‘तुम्ही रमजान ईदला शब्बीर मामूच्या घरी जा, ते तुम्हाला काजू- बदाम टाकलेला शीरखुर्मा पाजल्याशिवाय पाठवणार नाहीत’. तेव्हा ते दूध जन्नत मधून किंवा स्वर्गामधून आलेले नसते. शब्बीर मामूच्या सर्व प्रकारच्या समस्या सुटल्या पाहिजेत हे खरे, आणि त्याला माझा देखील पाठींबा. पण अशा समस्या फक्त शब्बीर मामुच्याच आहेत का? इतरांच्या नाहीत का? शब्बीर मामू पद्मश्री आहेत म्हणून फक्त त्यांच्याच समस्या सुटल्या पाहिजेत का? याचा उहापोह करणे क्रमप्राप्त.
सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असणारे माझे बीडचे मित्र अशोक तांगडे यांनी मला २३ मार्च रोजी व्हाट्सअँप वर तीन चार पोस्ट केल्या. त्या होत्या पद्मश्री शब्बीर मामू यांच्या समस्ये संदर्भात. या समस्या घेऊन अशोक तांगडे, मनीषाताई तोकले, शिरूरचे पत्रकार आणि माझे वर्गमित्र गोकुळ पवार हे शब्बीर मामू यांना सोबत घेऊन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे  गेले. समस्या कसल्याही असो. त्या सुटाव्यात एवढेच. अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी शब्बीर मामूच्या विविध समस्या सोडवण्याचे प्रयोजन केले. संबंधितांना तसे फर्मानही सोडले. शब्बीर मामूच्या समस्ये पैकी एक समस्या अशी की, शब्बीर मामू यांना केंद्र शासनाने २०१९ साली पद्मश्री बहाल केलेला पण त्यांना अद्याप तसे ओळखपत्र दिलेले नाही. अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी तसे ओळखपत्र मिळवून देण्याचेही सांगितले. आता हा पुरस्कार दिल्यानंतर तसे ओळखपत्र देण्याचे प्रयोजनच नाही, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आणि  शब्बीर मामूला हे कोण सांगणार? अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे भावनेच्या भरात बोलले. त्यांच्या भावनेचा आदराचं. पद्मश्री पुरस्कार हा केवळ सन्मान आहे. या पुरस्कारासोबत कोणताही रोख भत्ता किंवा रेल्वे/विमान/बस प्रवास इत्यादी स्वरूपात कोणतीही सवलत दिली जात नाही. पुरस्कार हे शीर्षक नाही आणि लेटर-हेड, निमंत्रण पत्रिका, पोस्टर्स, पुस्तके इत्यादींवर पुरस्कार विजेत्याच्या नावाच्या पुढे किंवा मागे तसा उल्लेख केला जाऊ शकत नाही. त्याचा गैरवापर झाल्यास ती व्यक्ती या पुरस्कारापासून वंचित राहील. असा त्याचा नियम आहे.
आता पद्मश्री पुरस्कारासाठी कोणत्या व्यक्तीची निवड करावी आणि ती कशी करतात हे समजून घेणे गरजेचे. पद्म पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांकडून प्रतिवर्षी एक समिती नियुक्त करण्यात येत असते. या समितीला पद्म-पुरस्कार-समिती असे म्हणतात. मंत्रिमंडळ-सचिव (कॅबिनेट सेक्रेटरी) हे ह्या समितीचे प्रमुख असतात. गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव चार ते सहा ख्यातनाम व्यक्ती समितीत सदस्य म्हणून समाविष्ट असतात. ही समिती राज्याकडून आलेल्या नामांकनातून पुरस्कारासाठी नावे निश्चित करते आणि ही नावे समितीद्वारे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना मान्यतेसाठी सादर करतात. दुसरे असे की, हा पुरस्कार विविध क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. उदा. विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या किंबहुना अशा कार्यामुळे देशहित, देशसेवा घडलेली असेल त्यांची प्रामुख्याने या पुरस्कारासाठी निवड केली जाते. आता प्रश्न हा आहे की, शब्बीर मामुनी कोणती देशसेवा, देशहित केले? किंवा देशहिताचे काही संशोधन केले? शंभर गाई सांभाळणे हे काम अजिबात लहान नाही. पण या कामापेक्षा रोज दहा आजारी गाईवर किंवा कुठल्याही दहा प्राणी- पशु- पक्षी यांच्यावर उपचार करणाऱ्या ड्रेसरचे काम मोठे असते. मला यात अजिबात तुलना करायची नाही. शब्बीर मामू यांना हा पुरस्कार कसा मिळाला हे त्यांनाही निट समजणारे नाही. यामागे एक धर्मांध शक्ती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुळात आपल्याला ‘पद्म’ हे काय आहे हेच माहित नाही. ‘पद्मपाणी’ किंवा ‘पद्म’ याच्या इतिहासात गेल्यावर ते कळते. देशाचे असे सर्वोच पुरस्कार सटर- बटर माणसांना देऊन या पुरस्काराचे मूल्य कमी होणारे नसले तरी आपली संसदीय लोकशाही खिळखिळी करण्यास ते कारण ठरत असते. लोकशाही असलेल्या  पाश्चिमात्य देशामध्ये असे पुरस्कार विज्ञान- तंत्रज्ञान किंबहुना संशोधन करणाऱ्या संशोधकांना दिले जातात. म्हणून त्या देशाची प्रगती होते. आणि आपल्या देशात असे पुरस्कार जनावरे सांभाळणाऱ्या व्यक्तींना दिले जातात. विकसित आणि अविकसित हा जो देशा- देशाचा फरक आहे तो असा. आपण सुरुवातीला  तो ‘समस्येतील फरक’ घेतला, आता त्याचा शेवट करू. मामूला जेव्हा पद्मश्री भेटला तेव्हा मामू औरंगाबादचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांना भेटायला गेले. येथेच त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे उत्तर. पण तेव्हा सांगितले गेले की, मामूच्या समस्या घेऊन ते केंद्रेकरांकडे गेले. ते साफ चुकीचे.  सुनील केंद्रेकरांनी तेव्हा मामूच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले होते. पुढे काय झाले? काहीच नाही. ठपका कुणावर येतो? प्रशासनावरच. अधिकारी काम करत नाहीत असे बोलतातही लोक. हीच लोकशाही खिळखिळी करण्याची प्रक्रिया असते. आता सुनील केंद्रेकर यांना भेटायला मामू गेले का त्यांना नेले? तर नेले. ज्यांनी नेले त्यांनाही काही माहित नाही यातले. इथेच खरी गोम आहे. सुनील केंद्रेकर विध्यार्थी दशेत असतांना कोणत्या विचाराच्या विध्यार्थी संघटनेत होते? म्हणजे सुनील केंद्रेकर ज्या विचाराच्या स्कुलमध्ये शिकले आणि अशोक तांगडे, मनीषाताई तोकले, तुषार ठोंबरे ज्या सामाजिक विचारांच्या स्कुलमध्ये शिकले या दोन्ही विचाराचा इथे सांस्कृतिक संघर्ष आहे. एक समस्या सोडणारा विचार आहे तर दुसरा समस्या वाढवणारा विचार आहे. पण आपले समस्या सोडवणारे भावनेच्या भरात समस्या सोडवतात. असो, आपली मूळ समस्या आहे ती मामूचे प्रश्न सोडवण्याची. मामूच्या ज्या समस्या आहेत त्या सर्वांच्याच आहेत. मामूला मामू बनवणारी व्यवस्था आपल्या देशात आहे. ज्या व्यवस्थेला इथे असे मामू हवे आहेत. अशा मामूमुळे समस्येची चर्चा व्यवस्था केंद्रित होण्याऐवजी व्यक्तिकेंद्रित होते. एकट्या पद्मश्री शब्बीर मामूच्या समस्या निकालात निघाल्या म्हणजे, समाजाच्या समस्या निकालात निघत नाहीत. जेव्हा समाजाच्या समस्या निकालात निघतील तेव्हा शब्बीर मामूच्या समस्या शिल्लक राहणार नाहीत. डोक्यात समाजसेवा भरलेल्या आपल्या विद्वानांना हे केव्हा  कळणार? हा प्रश्न देशातील समस्येचा निरुत्तरच. किंबहुना तो व्यवस्थेला सोडवायचा नाही. हे असे सर्वत्र सुरूच आहे. लोकांना निरक्षर ठेऊन, जातीधर्माचे पाले-मुळे घट्ट करून सत्तेत यायचे आणि मामूसारख्या ग्रेट काम करणारांना थेट पद्मश्री द्यायचा आणि समस्या तसल्याच ठेवायच्या हा प्रकार म्हणजेच खऱ्या अर्थाने भाकडचे गाभडलेले…  

COMMENTS