Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकाश हॉस्पिटलवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना : निशिकांत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली जिल्हा हा वैचारिक विचारांचा वारसा जपणारा जिल्हा होता. मात्र, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या जन्मापासून ती विचारांची

पालिकेची निवडणुक विक्रम पाटील यांच्या नेतृत्वात लढवणार : सदाभाऊ खोत
सुरक्षतेच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून महाविद्यालय परिसरात पहाणी
राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी : पालकमंत्री

इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली जिल्हा हा वैचारिक विचारांचा वारसा जपणारा जिल्हा होता. मात्र, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या जन्मापासून ती विचारांची न राहता खूनशी, कुटनिती, विघातक प्रवृत्तीचा जिल्हा झाला आहे. विरोधकांच्या संस्थांना लक्ष करून त्या संपवण्याचा डाव चालू आहे. प्रकाश हॉस्पिटलच्या डॉक्टर, कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. हे प्रकरण येथेच थांबवावे, अन्यथा तुमच्या संस्थेच्या फाईली ही माझ्याकडे आहेत. आम्हाला टोकाचा संघर्ष करण्याची वेळ आणू देवू नका. इथून पुढे खोटे गुन्हे दाखल केले तर 1 कोटींचा दावा दाखल करणार असा इशारा माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, प्रकाश हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कोरोना काळात 1515 रूग्णांच्यावर जीवाची पर्वा न करता उपचार केले. यात काही कर्मचा-यांना जीव ही गमवाला लागला. रूग्णांची सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल झाल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. 1640 कर्मचारी या संस्थेवर अवलंबून आहेत. त्यांचा विचार पालकमंत्र्यांनी करावा. पालकमंत्र्यांनी दीनदुबळ्यांना आधार देणे, मदत करणे गरजेचे असते. मात्र, विद्यमान पालकमंत्री हे कुजके राजकारण, टोमणे मारणे हे दुर्देवाची गोष्ट करत आहेत.
पाटील म्हणाले, जिल्ह्यातील युवा नेते विशाल पाटील, विश्‍वजीत कदम, रोहित पाटील, संग्रामसिंह देशमुख, अमरसिंह देशमुख, रणधीर नाईक, पृथ्वीराज पवार यासारख्या युवा नेत्यांना ही अडचणीत आणण्याचे काम हे पालकमंत्री करत आहेत. नव्या पिढीला आधार देणे गरजेचे असताना त्यांच्या संस्थांना अडचणीत आणण्याचे काम ते करत आहेत. मी नगराध्यक्ष असताना तुमच्या शैक्षणिक संस्थेला पाणी दिले. आम्ही राजकारण केले नाही. मात्र, आमच्या संस्थेमध्ये जर तुम्ही राजकारण करत असाल तर तुमची इच्छा असेल तर लक्ष घातले जाईल. यासाठी माझ्याकडे फाईली तयार आहेत. ती वेळ आणून देवू नये, असा इशारा ही भोसले-पाटील यांनी दिला.
पालकमंत्र्यांनी कितीही दबाव, जोर जबरदस्ती, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विचाराने मंत्री पाटील यांच्याशी लढणार असल्याचे निशिकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, सांगली जिल्हा भाजपा सरचिटणीस संजय हवलदार, भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत, वाळवा तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप, वाळवा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष सतेज पाटील, प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन संदीप सावंत, वाळवा तालुका भाजपाचे उपाध्यक्ष निवास पाटील, अजित पाटील, सरचिटणीस दादासाहेब रसाळ, अक्षय कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

1 कोटीचा दावा ठोकणार
प्रकाश हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करता. तुमचा संघर्ष माझ्याशी आहे. कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल कराल तर खोटा गुन्हा दाखल करणार्‍यावर 1 कोटीचा दावा ठोकणार, असल्याचे निशिकांत भोसले-पाटील यांनी सांगितले.

आयत्या पिठावर रांगोळ्या
शंभर एकरामध्ये आम्ही शैक्षणिक संकुल उभा केले आहे. अनेकांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. संस्था निर्माण करणे ऐवढे सोपे नसते. त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागते हे आयत्या पिठावर रांगोळी ओढणार्‍याना काय माहिती असणार. मंत्री जयंत पाटील यांनी कोणतीही नवीन संस्था उभी केली आहे का?

प्रतीक पाटील यांची ओळख काय?
विशाल पाटील, मंत्री विश्‍वजीत कदम, रोहित आर. आर. पाटील, संग्रामसिंह देशमुख, अमरसिंह देशमुख, रणधीर नाईक, पृथ्वीराज पवार हे वारसा हक्काने व स्व:बळाचा वापर करून जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे. मात्र, पालकमंत्री यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे जिल्ह्यासाठी अपरिचित आहेत. प्रतीक यांना मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव अशी ओळख निर्माण झाली आहे. प्रतीक यांची जिल्ह्यात ओळख निर्माण होत नसल्याची चिंता मंत्री पाटील यांना लागली आहे.

COMMENTS