Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद उफाळून आला ; दोन गटात राडा 

  बीड प्रतिनिधी - बीडमध्ये शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि ग्रामस्थांमध्ये राडा झालाय. भांडणाचं कारण नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत

किसान विरोधी पारित केलेले तीन कायदे रद्द करा
अजून चांगले होईल. थोडा धीर धर..! | LOKNews24
सिनेट निवडणूक स्थगित का केली?

  बीड प्रतिनिधी – बीडमध्ये शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि ग्रामस्थांमध्ये राडा झालाय. भांडणाचं कारण नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे सांगितले जात आहे. बीड तालुक्यातील माळसजवळा गावात हा सर्व प्रकार घडला असून घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओत जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा गावातील काही जणांबरोबर लाठ्या, काठ्या आणि तलवारीच्या साहाय्याने हाणामारी होत आहे. यात तिघेजण जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो दाखल केला असून दोषींवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत.

या प्रकारानंतर कुंडलिक खांडे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली. तर जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मात्र मी केवळ भांडण सोडवण्यासाठी इथे गेलो होतो असं सांगत अरोपांचं खंडन केलं.

COMMENTS