यंदा खरीप क्षेत्र लाखाने वाढणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा खरीप क्षेत्र लाखाने वाढणार

पुणे : यंदाच्या वर्षी मान्सून लवकर अन् समाधानकारक हजेरी लावण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.खरिपाच्या सरासरी २ लाख ३४ हजार क्षेत्रा

अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला; फळबागा आणि रब्बीच्या पिकांवर परिणाम
’प्रतापगड’ची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी : संस्थापक पॅनलचे आवाहन
हुमगाव-बावधन रस्ता राजकीय इच्छाशक्ती अभावी अधांतरी..?

पुणे : यंदाच्या वर्षी मान्सून लवकर अन् समाधानकारक हजेरी लावण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
खरिपाच्या सरासरी २ लाख ३४ हजार क्षेत्रावर आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ३ लाख ४३ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा होईल, असा अंदाज आहे. सरासरीपेक्षाही सव्वा लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र वाढणार आहे. मका, उडीद, सोयाबीन पिकांना शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती असून खतं, बियाणे बाजारपेठेत व्यापारी, शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
रब्बीचा हंगामाचा जिल्हा, अशी प्रशासनाच्या दप्तरी सोलापूरची नोंद आहे. पण, मागील तीन वर्षांपासून जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने खरिपाची पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खरीप हंगामाच्या सरासरी क्षेत्रापेक्षाही एक ते दीड लाख हेक्टर जास्तीच्या क्षेत्रावर खरिपाची लागवड होत असल्याने रासायनिक खतं, बियाण्यांचे नियोजन करण्यासाठी प्रशासनास कसरत करावी लागतीय. सन २०२१ मध्ये ३ लाख ४० हजार ६७ हेक्टरवर पेरणी झाली होती. ६९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. गेल्यावर्षी पावसाची संततधार लागून राहिल्याने काढणीसाठी आलेली सोयाबीनची पिकं पाण्यात अडकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनची भरघोस पिकं येऊनही वेळेत रास होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षी बाजारपेठेत चांगल्या प्रतीचे सोयाबीनचे घरगुती बियाणे उपलब्ध होत नसल्याने महागडी बीयाणं शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत आहेत. पेरणीसाठी १९ हजार ५४८ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात एक हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. सोयाबीनच्या तुलनेत तूर, मूग, उडीद, बाजरी, मका पिकाचे पुरेसे बियाणे उपलब्ध झालेले आहे.

COMMENTS