मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील : मंत्री अस्लम शेख

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील : मंत्री अस्लम शेख

राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, सवलतीच्या दरात कर्ज तसेच आपत्तीच्या कालावधीतही शासन मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत

स्वातंत्र्य दिनी जन्म घेतलेल्या मुलींचे स्वागत
मराठा आंदोलनाची धग कायम
आक्षेपार्ह व्हीडीओमुळे किल्लारीत तणाव

राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, सवलतीच्या दरात कर्ज तसेच आपत्तीच्या कालावधीतही शासन मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना केली. विधानपरिषदेत राज्यातील मत्स्यव्यवसायाला मत्स्यशेतीचा दर्जा देणे, मत्स्यव्यवसायिकांना सवलतीच्या दरात कर्ज व इतर सुविधा देणे याबाबतीत तारांकित प्रश्न विधानपरिषद सदस्य निलई नाईक यांनी उपस्थित केला होता. या तारांकित प्रश्नाच्या चर्चेत राज्यमंत्री दतात्रय भरणे, विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. मत्स्यव्यवसाय विकास मंत्री श्री.शेख म्हणाले, राज्यात मत्स्यव्यवसायाच्या अनेक योजना आहेत. मच्छीमारांना क्यार, निसर्ग व तौक्ते सारखी वादळांच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान भरपाई दिलेली आहे. मत्स्यव्यवसाय विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेत, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

COMMENTS