Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आंदोलनाची धग कायम

आंदोलनाचा सर्वाधिक फटका एसटी सेवेला ; ऐन दिवाळीत प्रवाशांची तारांबळ

छ.संभाजीनगर ः राज्यात एका आठवड्यापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला असले असून, जालन्यासह इतर

संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
राज्यभर मराठा आंदोलनाचा भडका
आरक्षणासाठी 20 फेबु्रवारीला विशेष अधिवेशन

छ.संभाजीनगर ः राज्यात एका आठवड्यापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला असले असून, जालन्यासह इतर जिल्ह्यात देखील मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन तीव्र केले आहे. या आंदोलनामुळे अनेक जिल्ह्यात एसटी बसेसच्या फेर्‍या महामंडळाने रद्द केल्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. राज्यभरातील आंदोलनामुळे एसटीचे सुमारे 20 कोटींचे नुकसान झाले आहे.
गुरूवारी नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावरावर रास्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, याचबरोबर जालना-परभणी-नांदेड राज्य महामार्गावर भजन, कीर्तन आणि मुंडन आंदोलन करत आहेत. या दरम्यान राज्य महामार्गावर बैलगाड्या आडव्या लावून गेल्या चार तासापासून रास्ता रोको आंदोलनात करण्यात आहे. या आंदोलनामुळे गेल्या चार तासापासून राज्य महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे राज्य महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे गुरूवारी सलग पाचव्या दिवशी पुण्यातून मराठवाड्यात जाणार्‍या एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे पुण्यातून मराठवाडा विदर्भ आणि सोलापूरला जाणार्‍या 750 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठवाडा विदर्भ जाणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. पुण्यातून एसटी बसच्या दररोज 1 हजार 556 फेर्‍यांची नियोजन केले जाते. आंदोलनामुळे 750 फेर्‍या रद्द करण्यात आल्यात. प्रामुख्याने बीड जिल्ह्यासह अमरावती, नागपूर, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील फेर्‍या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यातही मराठा आरक्षणाची धग कायम आहे. चार दिवसांपासून परभणी, पाथरी, गंगाखेड, जिंतूर, हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या सात आगारातून धावणारी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने परभणी विभागाला पावणे दोन कोटींचा फटका बसला आहे. लाल परीची सेवा बंद असल्याने खाजगी वाहन धारकांचे मात्र अच्छे दिन आले तर प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठी कात्री बसली आहे. नाशिकहून मराठवाड्याकडे जाणार्‍या एसटी बसेस देखील बंदच आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील 4 दिवसांपासून नाशिकहून मराठवाड्याकडे जाणारी एसटी सेवा बंद आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, परभणी, पैठण यासह मराठवाड्यातील अन्य शहरात जाणारी एसटी सेवा बंद आहे.

जालन्यात सरकारची काढली गाढवावरून धिंड – मराठा आरक्षणासाठी मागील आठवड्यापासून पुन्हा एकदा आंदोलन उभारण्यात आले आहे. राज्यात आंदोलन तीव्र झाले असताना सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेतला जात नाही. यामुळे संतप्त सकल मराठा आंदोलकांकडून सरकारचा निषेध करत सरकारची गुरूवारी गाढवावरून धिंड काढण्यात आली.  मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर राज्य सरकारकडून कुठल्याच प्रकारचा अद्यापही तोडगा निघालेला नाही. सकल मराठा समाजाच्या वतीने मंठ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांचे फोटो गाढवाच्या चेहर्‍यावर लावून राज्य सरकारची धिंड काढत राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला.

COMMENTS