Homeताज्या बातम्यासंपादकीय

सरकारचे धोरण, शेतीचे मरण

शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्याला कधीच आर्थिक स्वातंत्र्य देण्यात आलेले नाही. कारण त्याच्या मालाचा दर हा तो ठरवत नसून, व्यापारी

जात पंचायतीचा जाच थांबेना
दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई
इस्त्रोची गगनभरारी

शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्याला कधीच आर्थिक स्वातंत्र्य देण्यात आलेले नाही. कारण त्याच्या मालाचा दर हा तो ठरवत नसून, व्यापारी किंवा शेतकरी ठरवतो. त्यामुळे शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत असतो. देशात आजमितीस 50 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे, तिथे शेतीच्या समस्यांचे मूळ शोधण्यात आणि त्या प्रश्‍नांचे निवारण करण्यात आजवर एकाही सरकारने पुढाकार घेतला नाही. सार्‍याच राजकीय पक्षांनी शेतकर्‍यांसाठी फक्त तात्पुरत्या स्वरूपात मदतीच्या घोषणा केल्या आणि शेतकर्‍यांना झुलवत ठेवले. कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांना पुन्हा पंगु बनवण्यात येते, आणि शेतकर्‍यांना सरकारवरील अवलंबित्व वाढवले जाते. त्याऐवजी शेतकर्‍याला आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण करण्याची खरी गरज आहे. ज्या दिवशी शेतकरी आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होईल, त्याचदिवशी तो सुखी होईल. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी आजही आपल्या रोजच्या जीवन-मरणाशी झुंज देतांना दिसून येत आहे. दरवर्षी त्याची परीक्षा घेण्यात येते. एकही वर्ष त्याला सुखाचे जात नाही, यामागचे प्रमुख कारण म्हणजे सरकारचे धोरण आणि शेतीचे मरण यात दडले आहे. कालच नांदेडमध्ये दोन तर हिंगोलीमध्ये 2 अशा चार शेतकर्‍यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. बरं या शेतकर्‍यांवर कर्जांचा डोंगर तरी असून असून, किती असेल, तर तो काही लाखांच्या घरात. तरीदेखील हा शेतकरी आपला स्वाभिमान जपत मृत्यूला कवटाळतांना दिसून येत आहे. त्याला वेदना होत नसेल, त्याला आत्महत्या करतांना, आपले कुटुंब, आपले मुलं-बाळं उघड्यावर पडतील, याची कसलीही भ्रांत नसेल का. त्याला या सर्वांची जाणीव असून देखील कोणताही मार्ग निघत नसल्यामुळेच तो आत्महत्येचा मार्ग निवडतांना दिसून येत आहे. सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होत असतांना, या भागात अजूनही सिंचनाच्या पुरेशा सुविधा करण्यात सरकारला यश येतांना दिसून येत नाही. शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नसून तो अनेक दशकांपासूनचा विषय आहे. मात्र त्याच्यावर अजूनही मार्ग निघतांना दिसून येत नाही. शेतकरी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. कारण रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात. कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते. शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होण्या शिवाय पर्याय नसतो. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ या सारखे जीवनाश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे म्हणून शेतकर्‍याला ’जगाचा पोशिंदा’ म्हटल्या जाते. शेतीतील माल निघाला तरच, पुढील सेवा सुरू होतात. शेती उत्पादनातूनच कच्चा माल इतर उत्पादनासाठी उपलब्ध होतो. असे असतांना, शेतकरी मात्र कधीच सुखी असल्याचे दिसून येत नाही. कारण शेती करताना शेतकर्‍याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणार्‍या अनेक संकटांचा सामना करावा लागतो, हवामानात अचानक होणार्‍या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने शाश्‍वत कमाईचा नक्की अंदाज बांधणे कठीण असते तसेच शेतकर्‍यांसमोर हमीभावाची समस्या आहे. शेतकर्‍याला अजूनही हमीभाव मिळत नाही. 

COMMENTS