Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आज पासून महसूल सप्ताहाचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी - महसूल विभागाकडून देण्यात येणार्‍या सेवा आणि राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी व यात लाभधारकांचा सकारात्म

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी ३० अर्ज वैध
लेदरच्या कपड्यांमध्ये हनुमान
सचिव भांगे यांचा तो दौरा बेनामी संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी का ?

नांदेड प्रतिनिधी – महसूल विभागाकडून देण्यात येणार्‍या सेवा आणि राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी व यात लाभधारकांचा सकारात्मक सहभाग वाढावा या उद्देशाने आज 1 ऑगस्ट महसूल दिनापासून जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज मंगळवार 1 ऑगस्ट 2023 रोजी दरवर्षीप्रमाणे महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ ओम गार्डन येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होणार आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज  कार्यक्रमाचा शुभारंभ, 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद, 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट रोजी महसुली अधिकारी कर्मचार्‍यांची  संवाद इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महसूल सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे, लोकांची महसूल विषयक विविध कामे, सैनिकांची विविध कामे, यासाठी वेगवेगळ्या स्तरावर उपक्रमाचे आयोजन करून जनसहभागाद्वारे लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

COMMENTS