Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारी कर्मचारी दुसर्‍या दिवशीही संपावर

शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील शासकीय कर्मचारी, निमशासकीय तसेच शिक्षक या सर्वांनी सलग दुसर्‍या दिवशी संपात भाग घेत कामकाज बंद ठेवले. यावेळ

डोळे हलताना दिसले…पाणी पाजले आणि तो उठून बसला…
थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ
अहमदनगर : एकाच दिवसात झाले 1338 कोरोना बाधित ; कोरोनाचा विस्फोट

शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील शासकीय कर्मचारी, निमशासकीय तसेच शिक्षक या सर्वांनी सलग दुसर्‍या दिवशी संपात भाग घेत कामकाज बंद ठेवले. यावेळी संपावर असलेल्या कर्मचार्‍यांनी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर बसत जुनी पेन्शन योजना लागू करावी या घोषणा देत आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार कुंदन हिरे यांना संपात सहभागी झालेले सर्व कर्मचार्‍यांनी व शिक्षकांनी दिले.
जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात असल्याचे संघटनेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. सरकारकडून कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर जात आहे सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात येत असले तरी निर्णयाची शाश्‍वती सरकार देत नसल्याने कर्मचारीनी संप पुकारला आहे. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,शिक्षक भरती,महाराष्ट्र शिक्षक सेना, शिक्षक परिषद,राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघ या संघटना संपात सहभागी झाल्या. या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय पेन्शन स्कीम रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी शासकीय कर्मचारी नीमच सरकारी कर्मचारी शिक्षकांची मागणी आहे. राज्यात 2005 पासून सेवत दाखल झालेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन म्हणजेच कुटुंब निवृत्ती योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आहे सध्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही त्यामुळे वेतन आयोग कडून नियमित वेतन आणि पेन्शन वेळेत मिळत नाही. त्यामुळे शासकीय कर्मचारी ज्याप्रमाणे कोषागारहातून वेतन,पेन्शन घेतात ती पद्धत लागू व्हावी आधी मागणी या निवेदनात करण्यात आले आहे.

COMMENTS