Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

Yamaha RX100 चाहत्यांसाठी खुशखबर

कंपनीने लॉन्च संदर्भात केली मोठी घोषणा

यामाहा आरएक्स100... अनेकांचीच ड्रीम बाईक. नव्वदचं दशक गाजवणारी ही बाईक त्यावेळी अक्षरश: धुमाकूळ घालून गेली असं म्हणायला हरकत नाही. कारण, चित्रपट

Nokia G310 लॉन्च! कमी किमतीत दमदार फीचर
बंदी हटवल्यानंतर लोकप्रिय बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया आज प्ले स्टोअरवर होणार दाखल !
खिशात मोबाईलचा स्फोट 

यामाहा आरएक्स100… अनेकांचीच ड्रीम बाईक. नव्वदचं दशक गाजवणारी ही बाईक त्यावेळी अक्षरश: धुमाकूळ घालून गेली असं म्हणायला हरकत नाही. कारण, चित्रपट म्हणू नका किंवा रस्ते, जिथंतिथं ही बाईकच दिसत होती. आजही असे अनेकजण तुम्ही पाहिले असतील ज्यांनी त्यांच्याकडे असणारी ही बाईक जपून ठेवली असेल. दमदार लूक, बाईकचा आवाज आणि मायलेज या साऱ्याच्याच बाबतीत अग्रगणी असणाऱ्या या बाईकबद्दलचं प्रेम आणि तरुणाईमध्ये असणारं वेड आजही कमी झालेलं नाही. बीएमडब्ल्यू, जावा, एनफिल्ड, हायाबुजा या आणि अशा इतरही बाईकच्या शर्यतीत यामाहाची आरएक्स100 आजही तिची लोकप्रियता कायम टिकवून आहे. काय म्हणता, तुम्हीसुद्धा ही बाईक खरेदी करण्याचं स्वप्न पाहिलंय? ही बातमी तुम्हाला आनंदच देणार. कारण, आरएक्स100 पुन्हा तुमच्या भेटीला येतेय, तिसुद्धा नव्या रुपात.

सूत्रांच्या माहितीनुसार आता ही बाईक टू स्ट्रोक इंजिनवरून थेट 4 स्ट्रोक इंजिनच्या रुपात लाँच केली जाईल. आधीच्या व्हेरिएंटमध्ये बाईकला 98CC चं इंजिन होतं. आता नव्या बाईकला मात्र 200 सीसीचं इंजिन देण्यात येणार आहे. हो, पण या इंजिनच्या बाईकला सुरु केल्यानंतर जुन्या बाईकसारखा आवाज मात्र होणार नाहीये. 1996 मध्ये आलेल्या सरकारच्या नियमानंतर कंपनीकडून ही बाईक Discontinue करण्यात आली होती. ज्यानंतर इतक्या वर्षांनी ही बाईक एका नव्या रुपात सर्वांच्या भेटीला येणार आहे. यामाहाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ईशिता चौहान यांनी याबाबतची माहिती दिली. ‘ही बाईक बाजारात बरीच लोकप्रिय राहिली होती. बाईकची स्टाईलिंग आणि कमी वजन या घटकांनी तिला आणखी प्रभावीपणे अधिकाधिक बाईकप्रेमींपर्यंत पोहोचवलं’, असं त्या म्हणाल्या.

COMMENTS