Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यावरण दूत बबनराव डहाळे यांचा गौरव  

राहुरी/प्रतिनिधी ः केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान 2023 व महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा 3.0च्या धर्तीवर राहुरी नगरपरिषदेच्या वतीने बबनराव रंग

आईचे मरणोपरांत विधी टाळत विधायक कार्यास देणगी
अहमदनगरचे नाव आता होणार अहिल्यानगर
करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना किराणा वाटप

राहुरी/प्रतिनिधी ः केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान 2023 व महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा 3.0च्या धर्तीवर राहुरी नगरपरिषदेच्या वतीने बबनराव रंगनाथ डहाळे यांना पर्यावरण दूत म्हणून निवड करून सन्मानित करण्यात आले. स्वच्छता विषयक व पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षणासाठी वृक्षारोपन, प्लॉस्टिक बंदी, जलसंवर्धन अक्षय उर्जेचा (सौर, पवन, बायोगॅस ऊर्जा इ. वापर व प्रचार- प्रसार केला अशा व्यक्तींची निवड पर्यावरण दूत म्हणून करण्यात आली. बबनराव डहाळे हे राहुरी नगरपालिकेत सेवेत असताना राहुरी शहर व परिसरात पाच हजाराहून अधिक झाडे लावण्याचा त्यांनी संकल्प पूर्ण केला होता .  सेवानिवृत्त डहाळे हे सध्या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी व पर्यावरण विषयक जनजागृती करत आहेत . प्रजासत्ताक दिनानिमित्त राहुरी नगरपालिकेच्या आवारात पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिन बांगर यांनी डहाळे यांना पर्यावरण दूत सन्मानपत्र देऊन सत्कार केला . यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. डहाळे यांचे अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS