Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी सीएसएमएस सहा महिन्यांचा मोफत कोर्स – शिंदे

राहुरी/प्रतिनिधी ः राज्यातील अग्रगण्य असणार्‍या ’सारथी’ व ’एमकेसीएल’ यांच्या माध्यमातून सीएसएमएस हा विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचा मोफत अभ्यासक

एस टी कामगारांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल- नामदार शंकरराव गडाख
Aaurangabad : सार्वजनीक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर वाहनधारक नाराज (Video)
अहमदनगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण

राहुरी/प्रतिनिधी ः राज्यातील अग्रगण्य असणार्‍या ’सारथी’ व ’एमकेसीएल’ यांच्या माध्यमातून सीएसएमएस हा विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचा मोफत अभ्यासक्रम एक फेब्रुवारीपासून राहुरी सुरू होणार असल्याची माहिती संचालक विजय शिंदे यांनी दिली.
शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, मराठा, कुणबी, युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था) व एम.के. सी. एल (महाराष्ट्र ज्ञान मंडळ) या संस्थेच्या वतीने हा मोफत अभ्यासक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा समाजातील युवक युवतींना हा अभ्यासक्रम मोफत असून, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हा वयोगट 18 ते 45 व किमान दहावी उत्तीर्ण असावा. तसेच पालकाचे उत्पन्न आठ लाखांनी पेक्षा कमी असावे, अशी पात्रता आहे. राहुरी तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा एनआयआयटी कॉम्प्युटर्स, शुक्लेश्‍वर चौक, राहुरी, येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक विजय शिंदे यांनी केले आहे.

COMMENTS