Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गवळीच्या कुटुंबियांना न्याय द्या

हिंगोलीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे संबोधी मित्रमंडळाची मागणी

हिंगोली ः हिंगोलीमध्ये भर रस्त्यात गळा चिरून बौद्ध समाजातील तरूणाची हत्या करण्यात आली आहे. या तरूणाचे नाव राहुल नारायण गवळी असून, हा तरूण जुनुना तालु

लातुरात अभियंत्याचे घर फोडले; साडेसहा लाखांची रोकड पळविली
भोकर तालुक्यात भाजपाला खिंडार
कन्नड तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

हिंगोली ः हिंगोलीमध्ये भर रस्त्यात गळा चिरून बौद्ध समाजातील तरूणाची हत्या करण्यात आली आहे. या तरूणाचे नाव राहुल नारायण गवळी असून, हा तरूण जुनुना तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे. मात्र जातीयवादी मानसिकतेतून या तरूणाची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी संबोधी मित्रमंडळाच्या पदाधिकार्‍यांनी या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे.
संबोधी मित्रमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये मिळणारी मदत कुटुंबीयांना त्वरित द्यावी, कुटुंबातील कर्ता पुरूष गेल्यामुळे अनुसूचित-जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये करण्यात येणार्‍या पुनर्वसन अन्वये जुनुना तालुका वसमत या गावात उपलब्ध असलेल्या गायरानमधून 5 एकर जमीन देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये देण्यात येणार्‍या मदतीनुसार कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी/त्वरित पेन्शन लागू करण्यात यावे. जी महिला गावातील एक-दोन गावगुंडांना हाताशी धरून गावातील समाजाला वेठीस धरत आहे, त्या महिलेला हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमतमध्ये दाखल झाल्याचे समजते. तो त्वरित मंजूर करणे. तसेच हा प्रस्ताव जर यापूर्वीच मंजूर झाला असता तर, राहुल गवळी या तरूणाचा जीव वाचला असता. गावकरी भयभीत झाले असून, त्यांना संरक्षण देण्याची मागणी संबोधी मित्रमंडळाने हिंगोलीच्या जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, वसमत, सहायक आयुक्त समाजकल्याण हिंगोली, पोलिस उपाधीक्षक पीसीआर हिंगोली यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर संबोधी मित्रमंडळाचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे, अ‍ॅड. एल.आर.कांबळे, मुरलीधर ढेंबरे, अ‍ॅड. सुनील बगाटे, बंडू नरवाडे, एकनाथ खंदारे दिपक मानवते, रोहिदास साखरे, बालाजी म्हस्के, विजय बगाटे, अ‍ॅड. सुनील कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा – राहुल गवळीची हत्या ज्या आरोपींनी केली, त्या आरोपींला कठोर शिक्षा व्हावी. यासाठी विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्यात यावी, आरोपीला शिक्षा होणे कामी विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करण्यात यावी. सदरील खटला जलदगती न्यायालयापुुढे चालवण्यात यावा अशी मागणी संबोधी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS