Homeताज्या बातम्यादेश

जनरल उपेन्द्र द्विवेदी बनले नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली ः लष्करप्रमुख मनोज पांडे रविवारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

Ahmednagar : शहरात खळबळ… पोलीस ठाण्यातच आढळला मृतदेह
झाकीर नाईकच्या संघटनेवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली
कोरडवाहूला एकरी 25 तर बागायतीला 50 हजारांची मदत द्या

नवी दिल्ली ः लष्करप्रमुख मनोज पांडे रविवारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. जनरल द्विवेदी हे 30वे लष्करप्रमुख आहेत. या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी ते लष्कराचे उपप्रमुख झाले होते. लष्करप्रमुख झाल्यावर द्विवेदी यांना लेफ्टनंट जनरलवरून जनरल पदावर बढती देण्यात आली. भारत सरकारने 11 जूनच्या रात्री त्यांना लष्करप्रमुख बनवण्याची घोषणा केली होती. यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि लष्करातील इतर अनेक कमांडचे प्रमुख म्हणून काम केले आहे. जनरल द्विवेदी यांनी जनरल मनोज पांडे यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जनरल मनोज पांडे हे आजच निवृत्त झाले आहेत. शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांना लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ते 26 महिने लष्करप्रमुख राहिले.

COMMENTS