उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता ?

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष निर्णयक टप्प्यावर येऊन पोहचला असून, आज सायंकाळी ५ वाजता सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे. न्या

नगरच्या भ्रष्ट शिक्षण विभागावर कारवाई होईल का ?
जुन्या वादातून पंधरा वार करुन दारुविक्रेत्याची क्रूर हत्या | LokNews24
खासगी सावकारीतून तरूणावर शस्त्राने वार

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष निर्णयक टप्प्यावर येऊन पोहचला असून, आज सायंकाळी ५ वाजता सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे. न्यायालयातील निर्णय जर विरोधात लागला तर उद्धव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर थोड्याच वेळात म्हणजे सायंकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयामध्ये दिलासा न मिळाल्यास उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुवाहाटीवरुन तीन वाजताच्या सुमारास शिंदे गट गोव्यासाठी रवाना होणार होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.

COMMENTS