Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम पब्लिक स्कूलची शंभर टक्के निकालची 18 वर्षाची परंपरा कायम

कोपरगाव : मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेमध्ये कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी, संचालित गौतम पब्लिक स्कूलने आपली 18 वर्

हिंदी साहित्यामधून मानवतेची शिकवण : डॉ. देवेंद्र बहिरम
सुरेशनगरमध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर उत्साहात
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला रिपाइंने दिले समर्थन

कोपरगाव : मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेमध्ये कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी, संचालित गौतम पब्लिक स्कूलने आपली 18 वर्षाची 100% निकालाची ऐतिहासिक परंपरा अबाधित ठेवली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाने घेतलेल्या मार्च 2024 च्या एस. एस. सी. परीक्षेसाठी गौतम पब्लिक स्कूलचे एकूण 101 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. यामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये 70 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीमध्ये 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर  द्वितीय श्रेणीमध्ये 03 विद्यार्थी उत्तीर्ण होवून सर्वच विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. कुमार वेदांत ज्ञानदेव निर्मळ या विद्यार्थ्यांने 91% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला तर कु. समृद्धी कौतिक रसाळ या विद्यार्थिनीने 89.80% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आदित्य प्रकाश देशमुख व कु.आदिती विकास तासकर या विद्यार्थ्यानी समसमान 89.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्‍वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांनी शाळेचे प्राचार्य नूर शेख,पर्यवेक्षिका श्रीम.शेलार तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व उज्वल यश संपादन करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांनी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी गौतम पब्लिक स्कूल हि इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू केली. राज्यातील नावाजलेली शाळा म्हणून गौतम पब्लिक स्कूलकडे पाहिले जाते. संस्थेच्या सचिव चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही गौतम पब्लिक स्कूलचा मोठा दबदबा आहे. त्यामुळे दरवर्षी शंभर टक्के निकालाची व उज्वल यशाची ऐतिहासिक परंपरा राखण्याची गोडी गौतम पब्लिक स्कूलला लागलेली असून गौतम मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे फक्त कोळपेवाडी व परिसरातील नव्हे तर संपूर्ण राज्याच्या कानाकोपर्‍यातील  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि आपले उज्वल भविष्य घडवीत आहेत.

गौतम पब्लिक स्कूल मध्ये गुणवत्तेबाबत तडजोड नाही – विद्यार्थी व पालकांच्या  विश्‍वासाला सार्थ ठरवून सर्व शिक्षक वृंद योग्य न्याय देवून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या विश्‍वासाला पात्र ठरलेल्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये दरवर्षी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी झुंबड उडालेली असते व दरवर्षी  शाळा सुरु होण्यापूर्वीच प्रवेश क्षमता पूर्ण झाल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांची ईच्छा असून देखील या विद्यार्थ्यांना गौतम मध्ये प्रवेश देता येत नाही याची खंत जरूर आहे मात्र गौतम पब्लिक स्कूल मध्ये गुणवत्तेबाबत तडजोड होत नाही.- सौ.चैतालीताई काळे.  

COMMENTS