अग्निपथ योजनेंतर्गतच सर्व भरती होणार : अनिल पुरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अग्निपथ योजनेंतर्गतच सर्व भरती होणार : अनिल पुरी

लष्कराचे सरासरी वय 32 वरुन 26 करण्यासाठीच ही योजना

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील उत्तरेकडील राज्यात अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनानंतर रविवारी संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद आपल

फलटण नगरपरिषदेच्या खुल्या भूखंडावर अतिक्रमण; स्थानिक नागरिकांचा उपोषणाचा इशारा
समलिंगी विवाहांना केंद्राचा विरोध कायम  
पत्रकार संघाच्या राज्य सचिवपदी राजेंद्र वाघमारे यांची नियुक्ती

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील उत्तरेकडील राज्यात अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनानंतर रविवारी संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद आपली भूमिका स्पष्ट केली. अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसून सर्व भरती या योजनेंतर्गत होणार असल्याचेही यावेळी लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी स्पष्ट केले. 25 हजार अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबरमध्ये सैन्यात दाखल होणार आहे.
भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले की, 21 नोव्हेंबरपासून पहिली नौदल अग्निवीर तुकडी ओडिशातील आयएनएस चिल्का या प्रशिक्षण संस्थेत पोहोचण्यास सुरुवात करेल. यासाठी पुरूष आणि महिला अग्निविरांना परवानगी असेल. भारतीय नौदलात सध्या भारतीय नौदलाच्या विविध जहाजांवर 30 महिला अधिकारी आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत महिलांचीही भरती करू, असे आम्ही ठरवले आहे. त्यांना युद्धनौकांवरही तैनात केले जाईल.यावेळी बोलतांना पुरी म्हणाले की, लष्करातील बदलाची ही प्रक्रिया 1989 पासून सुरू आहे. लष्कराचे सरासरी वय 32 वर्षे होते, ते 26 पर्यंत खाली आणण्याचे आमचे लक्ष्य होते. यावर दोन वर्षे संशोधन करण्यात आले. तिन्ही लष्करप्रमुख आणि उऊड यांनी मिळून जगातील सर्व देशांच्या लष्कराचे सरासरी वय पाहिले. सैन्यात तरुणांची गरज आहे. उत्कटतेबरोबरच जाणीवही हवी. ज्या दिवशी अग्निपथची घोषणा झाली, त्यादिवशी दोन घोषणा झाल्या, पहिली देशभरात साडेदहा लाख नोकर्‍या आणि सैन्यात अग्निवीरच्या रूपाने 46 हजार जागा, पण लोकांपर्यंत फक्त 46 हजार एवढीच माहिती पोहोचली. कोरोनामुळे वयात बदल करण्यात आला. पुढील 4-5 वर्षांत आपल्या सैनिकांची संख्या 50-60,000 होईल आणि नंतर ती 90,000-1 लाखांपर्यंत वाढेल. आम्ही योजनेचे विश्‍लेषण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी 46,000 पासून लहान सुरुवात केली आहे. घोषणेनंतर होणारे बदल हे कोणत्याही भीतीपोटी नव्हते, परंतु हे सर्व अगोदरच तयार होते.

कोचिंग इन्स्टिटयूटचा आंदोलनामागे हात
कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणार्‍यांनी विद्यार्थ्यांना अग्निपथच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. अग्निवीर होणारी व्यक्ती आपण कोणतेही निदर्शने किंवा तोडफोड केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र देईल, असे पुरी यांनी यावेळी स्पष्ट केले. पोलिस पडताळणीशिवाय कोणीही सैन्यात भरती होणार नाही. पुरी म्हणाले की, तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तयार असले पाहिजे, जेणेकरून ते आमच्यासोबत सामील होऊन प्रशिक्षण घेऊ शकतील. या योजनेवर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा आम्हाला अंदाज नव्हता. सशस्त्र दलात शिस्तभंगाला स्थान नाही. कोणत्याही प्रकारच्या जाळपोळ, हिंसेमध्ये सहभागी होणार नाही, हे प्रत्येकाला लेखी द्यावे लागणार आहे.

COMMENTS