मुंबई ः मुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी बलात्कार केल्याच्या घटनेने मुंबई पुन्हा हादरली आहे. ही घटना मुंबईतील लोअर परेल भागा

मुंबई ः मुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी बलात्कार केल्याच्या घटनेने मुंबई पुन्हा हादरली आहे. ही घटना मुंबईतील लोअर परेल भागात घडली आहे. या प्रकरणात तीन आरोपी अल्पवयीन आहेत तर तीन सज्ञान आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पीडितेला तिचा मित्र त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला होता. जिथे सहा जणांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणी एन एम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून सर्व आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पीडितेचा बेस्ट फ्रेंडही सामील आहे. मुलीचा मित्र 23 डिसेंबर रोजी त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला, जिथे सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणाचा तपास एन.एम. जोशी पोलिस करत आहेत. आयपीसीच्या कलम 376 (डी) (2) (एन), 34 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तीन प्रौढ आरोपींनी यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत की, याचा तपास पोलीस करत आहेत. तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते.
COMMENTS