अहमदनगर/प्रतिनिधी ः घातक शास्त्रासह कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाठलाग करून सीताफिने पक
अहमदनगर/प्रतिनिधी ः घातक शास्त्रासह कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाठलाग करून सीताफिने पकडली या कारवाईत पोलिसांनी पाच लाखाचा मध्यमान जप्त ही कारवाई नगर शिर्डी रोडवरील निर्मळपिंप्री येथे केली.
या बाबतची हकिगत अशी की,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन त्यांचा शोध घेत असताना माहिती मिळाली की, शिर्डी नगर रोडवर, निर्मळपिंप्री येथे 5 ते 6 इसम पांढरे रंगाचे सुमो गाडीसह दरोडा घालण्याचे तयारीत रस्त्याचे कडेला अंधारात बसलेले आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने त्या ठिकाणी जावुन खात्री केली असता काही इसम अंधारात दबा धरुन बसलेले दिसले. पोलिस पथकाची चाहुल लागताच ते संशयीत इसम पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन पाच इसमांना ताब्यात घेतले. वेळी एक संशयीत इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अजय राजु भोसले ( वय 25,रा.साई निर्माण कॉलेज जवळ, कडबा, शिर्डी, ता. राहाता ) ऋतुंजय ऊर्फ अमोल अविनाश कुंदे ( वय 19,रा. एकरुखे, ता.राहाता ) योगेश किशोर कांबळे ( वय 19, रा.बाजारतळ, कालीकानगर शिर्डी, ता. राहाता ) साईराम राजु गुडे ( वय 23, रा. पिंपळवाडी रोड साईश कॉर्नर, पांडुरंग नगर, शिर्डी, ता. राहाता, ) एक अल्पवयीन मुलगा असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमाचे नाव सतिष बाबासाहेब खरात,( रा. शिर्डी, ता.राहाता ) असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये एक लोखंडी कोयता, एक चाकु, एकु स्क्रुड्रायव्हर, मिरचीपुड व एक पांढरे रंगाची सुमो गाडी असा एकुण 5 लाख 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. या प्रकरण लोणी पोलीस ठाण्यात भादविक 399, 402 सह आर्म क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
COMMENTS