Homeताज्या बातम्यादेश

सौरव गांगुलीच्या सुरक्षेमध्ये वाढ; बंगाल सरकारचा निर्णय

कोलकाता/प्रतिनिधी : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. पश्‍चिम बंगाल सरक

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा
एमएस धोनीची 7 नंबरची जर्सी होणार निवृत्त
अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श वर्ल्ड कप मधून अनिश्चित काळासाठी बाहेर

कोलकाता/प्रतिनिधी : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. पश्‍चिम बंगाल सरकारने गांगुलीला ’झेड’ सुरक्षा पुरवली आहे. याआधी त्याला ’वाय’ सुरक्षा होती. विशेष म्हणजे सौरव गांगुली याने सुरक्षा वाढवण्याची मागणी केली नव्हती. तरीही पश्‍चिम बंगाल सरकारने त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सौरव गांगुली याची जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणना होती. काही काळ त्याने बीसीसीआयचे अध्यक्षही भूषवले होते. सध्या तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाच्या ’डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ या पदावर आहे. मात्र त्याचा संघ प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर गेला आहे. आजच दिल्लीचा संघ आयपीएलच्या 16व्या हंगामातील आपला अखेरचा सामना खेळणार आहे. धर्मशाला येथे पंजाब किंग्सविरुद्ध हा सामना रंगणार आहे. 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने गांगुलीला गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गांगुलीने निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्यास नकार दिला. यादरम्यान त्याला बीसीसीआयचे अध्यक्षपदगी गमवावा लागले. आता आगामी काळामध्ये पश्‍चिम बंगाल विधानसभेची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ममता बॅनर्जी सरकारने गांगुलीची सुरक्षा वाढवून राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे. सौरव गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत 113 कसोटी, 311 एकदिवसीय आणि आयपीएलमधील 59 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 7 हजार 212 धावांची नोंद आहे. ज्यात 16 शतक आणि एका द्विशतकाचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार 363 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 22 शतक आणि 72 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहे.

COMMENTS