सातारा / प्रतिनिधी : शासनाच्या नियमानुसार वेळेत एफआरपी देणार्या साखर कारखान्यांमध्ये जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश झाला आहे. दोन कारखान्यांनी
सातारा / प्रतिनिधी : शासनाच्या नियमानुसार वेळेत एफआरपी देणार्या साखर कारखान्यांमध्ये जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश झाला आहे. दोन कारखान्यांनी अद्याप एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही. त्यांचा ‘रेड झोन’मध्ये समावेश केला आहे. याबाबत साखर आयुक्तांनी एफआरपीची रक्कम पूर्ण करणार्या कारखान्यांची यादी प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी अद्याप एफआरपीची 100 टक्के रक्कम पूर्ण केली नसल्याचे समोर आले आहे.
सातारा जिल्ह्यात यावर्षी किसन वीर कारखाना व खंडाळा कारखाना वगळता उर्वरित 13 साखर कारखाने गाळप करत आहेत. यामध्ये सहा सहकारी व 7 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. नोंदणी केलेल्या उसाचीच पहिली तोडणी केली जात आहे. आतापर्यंत सहकारी साखर करखान्यांनी 23 लाख 95 हजार 025 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 26 लाख 90 हजार 750 क्िंवटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना 11.23 टक्केसाखर उतारा मिळाला आहे. तर खासगी कारखान्यांनी 33 लाख 48 हजार 278 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 33 लाख 07 हजार 860 क्िंवटल साखरेची निर्मिती केली आहे. खासगी कारखान्यांना सरासरी 9.88 टक्के साखर उतारा मिळाला आहे. दोन्ही मिळून एकूण 57 लाख 43 हजार 303 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 59 लाख 98 हजार 610 क्िंवटल साखरेची निर्मिती जिल्ह्यात झालेली आहे. सरासरी एकूण 10.44 टक्के साखर उतारा मिळाला आहे.
ऊस गळितास नेल्यानंतर 14 दिवसांच्या आता संबंधित शेतकर्यांचे बिल त्यांच्या खात्यावर जमा करणे कायद्याने बंधनकारक केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी 100 टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी पूर्ण केली आहे. यामध्ये जवाहर-श्रीराम शुगर फलटण, अजिंक्यतारा साखर कारखाना शेंद्रे, बाळासाहेब देसाई साखर कारखाना पाटण, सह्याद्री साखर कारखाना कराड, रयत-अथणी शुगर कराड या कारखान्यांचा समावेश असल्याचे साखर आयुक्तांनी प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे. तसेच 80 ते 99.99 टक्के एफआरपीची रक्कम पूर्ण करणार्या कारखान्यांमध्ये जयवंत शुगरचा समावेश असून, त्यांनी आतापर्यंत 95.39 टक्केएफआरपीची रक्कम अदा केली आहे. तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 81.61 टक्केएफआरपी पूर्ण केली आहे. 60 ते 79.99 टक्केएफआरपीची रक्कम पूर्ण करणार्या कारखान्यांच्या यादीत दत्त इंडिया 68.86, ग्रीन पॉवर शुगर 66.14 या दोन कारखान्यांचा समावेश आहे. तर कराराप्रमाणे 59.99 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपीची रक्कम देणार्या कारखान्यांमध्ये जरंडेश्वर शुगर 59.11, शरयू ग्रो 39.07 या दोन कारखान्यांचा समावेश आहे. स्वराज इंडिया व खटाव-माण अॅग्रो प्रोसेसिंगने अद्याप एफआरपीची रक्कम अदा केलेली नसल्याने या दोन कारखान्यांचा समावेश ‘रेड झोन’मध्ये केला आहे. साखर आयुक्तांच्या या अहवालामुळे एफआरपी पूर्ण कारणारे व थकबाकी असलेल्या कारखान्यांची नेमकी परिस्थिती उघड झाली आहे.
COMMENTS