बीडमध्ये अपघातात चार जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये अपघातात चार जणांचा मृत्यू

बीड : बीडमध्ये पहाटे अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर झालेल्या बस आणि ट्रकच्या जोरदार धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून, तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. अ

टेलिप्रोम्पटर बंद पडल्याने पंतप्रधान मोदी गोंधळले
स्नेहलताताई कोल्हे यांची दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेत
छमछमला उस्थळ दुमाला गावातून एकमुखी विरोध !

बीड : बीडमध्ये पहाटे अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर झालेल्या बस आणि ट्रकच्या जोरदार धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून, तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बसचा समोरील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला होता. जखमींना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील बर्दापूर (ता. अंबाजोगाई) फाट्याजवळ रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि मालमोटारीची समोरासमोर धडक झाली. लातूर औरंगाबाद बस (क्रमांक एमएच 20, बीएल 3017) लातूर येथून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याजवळ एका वळणावर दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की बसचा समोरील भाग पूर्ण चक्काचूर झाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. मालमोटारीचा समोरील भाग एसटी बस मध्ये घुसल्याने बस एका बाजूने कापली गेली होती. सकाळच्या सुमारास दाट धुके होते. त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे.मयत आणि जखमींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

COMMENTS