संसद भवनात एकाच वेळी 400 जण कोरोनाच्या विळख्यात

Homeताज्या बातम्या

संसद भवनात एकाच वेळी 400 जण कोरोनाच्या विळख्यात

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून, गेल्या सात महिन्यानंतर काल तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर संसद भवनात

नोकर भरतीला होणारा विलंब
मी सगळ्या चौकशीसाठी तयार-चित्रा वाघ | LOK News 24
अजित पवारांच्या अडचणीत वाढ; राज्य बँक घोटाळ्याची ’पीएमएलए’ कोर्टाकडून दखल

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून, गेल्या सात महिन्यानंतर काल तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर संसद भवनात एकाच वेळी 400 कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.
6 आणि 7 जानेवारीला संसदेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी झाली होती, त्यामध्ये 400 हून अधिक जण कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे, प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. मुंबई प्रमाणे राजधानी दिल्लीत देखील रोज जवळपास 20 हजारांपेक्षा लोकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे सरकारने त्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी दिल्लीतर 20 हजार 181 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. शनिवारी झालेली रुग्णवाढ ही गेल्या आठ महिन्यांच्या तुलनेत फार मोठी आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेऊन 14 रुग्णालयात बेड्सची संख्या 4 हजार 350 वरून 5 हजार 60 केली आहे. तसेच रुग्णालयातील आयसीयू बेड्स वाढवून 2 हजार 75 केले आहेत.

COMMENTS