Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावली तालुक्यात चार ग्रामपंचायती बिनविरोध; 11 साठी होणार निवडणूक

मेढा / प्रतिनिधी : जावली तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार ग्रामप

पाटण तालुक्यातील नरबळी प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन घट्ट
औंधला नळपाणी पुरवठा योजनेसाठी 16 कोटी निधी मंजूर ; श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची माहिती
तरडगांव येथील जयश्री अडसूळ बेपत्ता

मेढा / प्रतिनिधी : जावली तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित 11 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 25 तर सदस्य पदासाठी 90 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. वाकी, रिटकवली, केळघर तर्फ मेढा, रामवाडी या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एकूण 107 सदस्य पदांपैकी 54 सदस्य बिनविरोध झाले आहेत. 45 जागांकरीता 90 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 8 जागांसाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता तर सरपंच पदाचा 1 आणि सदस्य पदाचा 1 अर्ज छाननित अपात्र ठरला होता.
या निवडणुकीत सोमर्डी व करहर या ग्रामपंचायतीसाठी सरपंच व सदस्य पदाच्या सर्व जागी निवडणूक लागली आहे. मोरघर ग्रामपंचायतीची एक जागा बिनविरोध तर सरपंच व सहा सदस्य जागांसाठी निवडणूक होणार आहे. आखाडे सरपंच व 4 सदस्य, ओझरे सरपंच व 6 सदस्य, रुईघर सरपंच व 2 सदस्य, शिंदेवाडी सरपंच व 1 सदस्य, वालुथ सरपंच व 3 सदस्य, भोगवली तर्फ कुडाळ सरपंच व 2 सदस्य, कुसुंबी सरपंच व 6 सदस्य, घोटेघर सरपंच व 1 सदस्य अशी 11 सरपंच पदासाठी व 45 सदस्य पदासाठी जावळीत निवडणूक लागली असल्याचे अर्ज माघारी घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे या ग्रामपंचायत निवडणूकीने आता गावातील वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.

COMMENTS