Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवापूरच्या कुस्ती मैदानात पिंपरीच्या पै. गणेश कुंकुलेची बाजी

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यातील देवापूर गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची यात्रा उत्साहात झाली. यानिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात पिंपरीच्य

महाराष्ट्र केसरी विजेत्यावर ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून बक्षिसांचा वर्षाव
विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे संसारोपयोगी साहित्य जळून खाक
शेंदूरजणे येथे जिलेटीनच्या 1600 कांड्या जप्त

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यातील देवापूर गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची यात्रा उत्साहात झाली. यानिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात पिंपरीच्या पै. गणेश कुंकुले याने गुणावर आटपाडीचा पै. सतिश मुडेवर मात करून 75 हजार रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले. ही कुस्ती उपसरपंच सुहास चव्हाण यांचे वतीने लावण्यात आली होती.
देवापूर-विरकरवाडी रोडवर भरविलेल्या कुस्ती मैदानात दुसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत बेनापूरच्या पै. खाशाबा मदने यांने सासवडच्या पै. तोसिफ मुलाणी यास पोकळ डिस्सा डावावर चितपट करून 51 हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. ही कुस्ती कै. युवराज माने यांच्या स्मरणार्थ भाऊसाहेब माने यांचे वतीने लावण्यात आली होती. तिसर्‍या क्रमांकाची कुस्तीत निमगावच्या पै. दत्ता बोडरे याने पिंपरीच्या पै. प्रतिक मानेवर बाजी मारली. ही कुस्ती सरपंच शहाजी बाबर यांच्या वतीने लावण्यात आली होती. चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती पै. महादेव माने व पै. शांतीलाल सरवदे यांची कुस्ती बरोबरीत सुटली. 25 हजार रुपये विभागून देण्यात आले. ही कुस्ती मलेश जाधव यांच्या वतीने लावण्यात आली होती. पाचव्या क्रमांकाची पै. राजेंद्र रुपनवर व पै. महादेव कचरे यांची कुस्ती बरोबरीत सुटली. 21 हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. ही कुस्ती माण तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस विजय बनसोडे यांच्या वतीने लावण्यात आली होती. सहाव्या क्रमांकाची कुस्ती पै. सुरज विरकर याने आकडी डावावर पै. विजय वाघमोडे याला चितपट करून 15 हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. ही कुस्ती कै. खंडू जाधव यांच्या स्मरणार्थ वस्ताद दशरथ जाधव यांच्या वतीने लावण्यात आली होती. त्याशिवाय देवापूर गावातील ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या लावलेल्या लहान-मोठ्या अनेक कुस्त्या झाल्या. संपूर्ण कुस्ती मैदानाचे समालोचन युवराज केचे यांनी केले.
कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे यात्रेच्या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी पै. विशाल जाधव, जय मल्हार तरूण मंडळ, श्री खंडोबा यात्रा कमिटी, ग्रामपंचायत देवापूर, विकास सोसायटी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

COMMENTS