Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्यातील 15 ग्रामपंचायती बिनविरोध; 71 ग्रामपंचायतीत होणार लढत

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील 86 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 160 तर

जावलीतील शाळांमधे ’गुढीपाडवा; पट वाढवा’ अभियानास प्रारंभ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
कराडच्या प्रशासकीय इमारतीत कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्यांना प्रवेश बंद
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 82 हजार 435 शेतकर्‍यांना मिळणार लाभ

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील 86 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 160 तर सदस्य पदासाठी 443 उमेवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचे निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
86 ग्रामपंचायतींपैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. केवळ औपचारिकता बाकी आहे. 71 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात निवडणुका होत आहेत. एकूण 20 गावचे सरपंच सह सदस्य पदासाठी एकूण 223 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच आता सदस्य पदांच्या 439 जागांसाठी व सरपंच पदाच्या 66 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सरपंच पदासाठी 155 तर सदस्य पदांसाठी 880 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी देसाई-पाटणकर या पारंपरिक गटात थेट लढत होणार असून शिवसेना उध्दव ठाकरे गटानेही अनेक ठिकाणी प्रस्थांपितासमोर आव्हान निर्माण केले आहे.
तालुक्यातील देसाई-पाटणकर या पारंपरिक विरोधकांसोबत आता ठाकरे गटही पूर्ण क्षमतेने सक्रीय झाल्याने अनेक ठिकाणी तिरंगी लढती पहावयास मिळणार आहेत. शिवाय काही ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसबरोबर भाजप, वंचित आघाडी, मनसेही आपली ताकदही आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. बिनविरोध झालेल्या अनेक ग्रामपंचायती देसाई गट, राष्ट्रवादी (पाटणकर गट) व शिवसेना ठाकरे गटांत सत्तेसाठी तडजोड करून बिनविरोध केल्या आहेत. काही ठिकाणी अडीज अडीज वर्षे सरपंच पद वाटून घेतले आहे. हेळवाक ग्रामपंचायतीत ठाकरे गटाचा सरपंच बिनविरोध निवडून आला आहे.
डिगेवाडी, हुंबरवाडी, चाळकेवाडी, जाधववाडी, जळव या ग्रामपंचायतीमध्ये फक्त सरपंच पदाची निवडणूक लागली आहे. तसेच संपूर्ण वार्ड बिनविरोध झाले आहेत. भूडकेवाडी, आबदारवाडी, कुसवडे, राहुडे, आणि येराड या ग्रामपंचायतत सरपंच बिनविरोध निवडून आले. इतर वार्डही अंशतः बिनविरोध झाले आहेत.
15 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यास यश
पाटण तालुक्यातील 86 ग्रामपंचायतींपैकी रासाटी, नाव, झाकडे, काठी, निवडे पुनर्वसन, पाणेरी, घोटील, मराठवाडी, वेखंडवाडी, साबळेवाडी, कळंबे, गोठणे, कराटे, हेळवाक, धजगाव या 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

COMMENTS