Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंदवाडी सेवा सोसायटी चेअरमनसह चार संचालक अपात्र

निवडणूक खर्च सादर न केल्याने केली कारवाई

श्रीगोंदा : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सार्वत्रिक निवडणुकीचा खर्च न दिलेच्या कारणाने

कर्जत-जामखेडच्या 158 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठणार
कोळगाव थडी सोसायटीच्या व्हा.चेअरमनपदी गणेश पानगव्हाणे

श्रीगोंदा : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सार्वत्रिक निवडणुकीचा खर्च न दिलेच्या कारणाने चेअरमन सह पाच संचालक अपात्र करण्याचा आदेश असहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी काढला. याबाबत दत्तात्रय नलावडे यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक 2022 रोजी पार पडली. सदर निवडणुकीसाठी निवडून आलेल्या संचालकांनी विहित मुदतीत निवडणूक हिशोब सादर केला नसल्याची तक्रार महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 2014 मधील नियम क्रमांक 66 मधील तरतुदीनुसार दत्तात्रय दादा नलवडे यांनी जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली होती. याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांना कायदेशीर प्रक्रिया पार पाडत सुनावणी घेण्याच्या आदेश देण्यात आले होते. सदर आदेशाच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक संस्था श्रीगोंदा अभिमान थोरात यांनी तक्रारदार दत्तात्रय नलावडे तसेच सोसायटीचे चेअरमन शांताराम पांडुरंग भोईटे, संचालक बाळासाहेब केशव गिरमकर, रमेश पोपट गिरमकर, उद्धव तुकाराम गिरमकर, सुनीता नारायण गिरमकर यांना त्यांची बाजू मांडण्याची योग्य ती संधी देण्यात आली होती. सदर सुनावणी सुरू असतानाच शांताराम भोईटे व इतरांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेश रद्द करणे बाबत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे पुनर्नरीक्षण अर्ज दाखल केला होता. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी भोईटे व इतरांचा पुनर्नरीक्षण अर्ज फेटाळून लावत जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांचा आदेश कायम केला होता. त्याच अनुषंगाने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी आज दिनांक 25/06/2024 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील निवडणूक नियम 2014 मधील तरतुदीनुसार आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शांताराम पांडुरंग भोईटे, संचालक बाळासाहेब केशव गिरमकर, रमेश पोपट गिरमकर, उद्धव तुकाराम गिरमकर, सुनीता नारायण गिरमकर यांना कलम 73 कअ (1) उपकलम (चार) व त्याखालील समिती निवडणूक नियम 2014 चे नियम 66 नुसार आनंदवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आनंदवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या संस्थेचे संचालक म्हणून राहण्यास तसेच पुढील तीन वर्ष कालावधीसाठी अपात्र केलेले असून सदर पदे रिक्त झाल्याबाबतचा आदेश दिलेला आहे. या निकालामुळे सहकारावर मोठा परिणाम होणार असून भोईटे व इतर संचालक काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. दत्तात्रय नलावडे यांच्या वतीने वकील म्हणून निलेश संतोष शेलार यांनी काम पाहिले तर त्यांना शिवराज कोकाटे यांनी सहकार्य केले.

COMMENTS