Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संघर्ष धान्य बँकेकडून के.प्रा.शा वसाहत बाग पिंपळगाव येथील शाळेत चार हजार रुपयांच्या साहित्याचे वाटप

तलवाडा प्रतिनिधी - आर आर बहिर गेवराई तालुक्यातील बागपिपळगाव येथे स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी जिल्हा परिषद बागपिंपळगाव येथील शाळेत गोरगर

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी वीस वर्षे कारावास
रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
इंदूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

तलवाडा प्रतिनिधी – आर आर बहिर गेवराई तालुक्यातील बागपिपळगाव येथे स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी जिल्हा परिषद बागपिंपळगाव येथील शाळेत गोरगरीब घटकातील मुलांना चार हजार रुपयाची शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री नामदेवराव शिंदे सर व सर्व शिक्षक  उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश भुते सर आदर्श शिक्षक श्री धनंजय सुलाखे सर व आदर्श शिक्षक दीपक रसाळ सर पिंपळगावचे सरपंच श्री जगताप व दैवतवाल तसेच गावकरी उपस्थित होते. याप्रसंगी स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सेवानिवृत्त शिक्षक श्री दीपक रसाळ व प्रकाश भुते सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी श्री धनंजय सुलाखे सर श्री प्रकाश भुते सर श्री रसाळ सर श्री जगताप व शाळेतील शिक्षक वृंदांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक,विद्यार्थी गावकरी यांच्याकडून संघर्ष धान्य बँकेच्या सर्व दात्यांचे आभार मानण्यात आले.

COMMENTS