Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वनव्याच्या ज्वालांनी वैराटगडावर लखलखाट: विघ्नसंतोषी लोकांमुळे पर्यावरणाचा र्‍हास

महाशिवरात्रीनिमित्त अनेकांची वैराटगड भेट होत असते. गेली दोन वर्षांपासून गडावर महाशिवरात्री उत्सवही साजरा झाला नाही. यावर्षीही हा उत्सव गडावर न होता क

भर पावसात खासदार हेमंत पाटील यांनी केली शेतीची पाहणी
अहमदनगर ब्रेकिंग : अण्णासाहेब शेलार यांचे ‘नागवडे’चे संचालकपद रद्द
अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला; फळबागा आणि रब्बीच्या पिकांवर परिणाम

महाशिवरात्रीनिमित्त अनेकांची वैराटगड भेट होत असते. गेली दोन वर्षांपासून गडावर महाशिवरात्री उत्सवही साजरा झाला नाही. यावर्षीही हा उत्सव गडावर न होता कापसेवाडी येथे झाला. यानिमित्ताने येणार्‍या भाविक, तरुणांना महामंडलेश्‍वर आबानंदगिरी महाराज यांनी निसर्ग संपदेचे रक्षण करावे, डोंगराला आग लावण्यासारख्या विध्वंसक कृती होऊ नये. म्हणून मीडियाच्या माध्यमातून आवाहनही केले होते. तरीदेखील विचारशून्य लोकांकडून असा हा निसर्गाचा होणारा संहार मानवाच्या विघातक प्रवृत्तीच दर्शवतो हेच खरे आहे.

कुडाळ / वार्ताहर : उन्हाळ्याची झाडांची पानगळ होऊन निसर्ग हिरव्यागार नव्या पालवीने सजण्यासाठी, शृंगाराचा साज अंगावर घेण्यासाठी तयार होतो. परंतू नेमके याच काळात ठिकठिकाणी वनव्यांची मालिका सुरू झालेली पाहायला मिळाते. आज जावळीच्या प्रवेशद्वाराजवळील असणार्‍या स्वराज्याचे शस्त्रागार किल्ले वैराटगडाला अशा विघ्नसंतोषी लोकांची नजर लागली. यात सारा डोंगर आगीच्या तांडवत लोटला गेल्याने रात्रीच्या अंधारात आगीचा लख्ख प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसत होता.
डोंगरावरील वाळलेल्या पालापाचोळ्याला निसर्ग विध्वंसक प्रवृत्तीच्या एका काडीने सारा हिरवागार दिसणारा निसर्ग आगीच्या ज्वाळांनी भस्मसात होताना दिसत होता. यामध्ये निसर्गाची आणि या अधिवासात राहणार्‍या निष्पाप सूक्ष्म जीवांची अपिरिमित हाणी झाली. या अधिवासात राहणार्‍या वन्यजीवांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेक प्राण्यांचा नाहक बळी जाऊन दुर्मिळ वनसंपदा नष्ट होत आहे. मंगळवारी वैराटगडाला अशाच विघ्नसंतोषी प्रवृत्तीची नजर लागली. कोप झाल्यासारखा डोंगरावर वनव्याच्या ज्वाळानी लखलखाट दिसू लागला. डोंगरावरील वनसंपदा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
आशा विघायक वृत्तींना आळा घालायला हवा. वणवा लावणार्‍यांची माहिती तात्काळ वनविभागाला कळवावी. निसर्ग संवर्धन आणि आपले जीवन समृध्द होण्याकरता सजग नागरिकत्वाची भूमिका बजवायला हवी. तरच भविष्यातील निसर्ग आपल्याला साद घालेल.

COMMENTS