Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात नाशिक राज्यात प्रथम

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा यांना प्रशस्तीपत्रक पत्रक देवून गौरव

नाशिक : राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात सर्व उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट क

कोकण मंडळाच्या 4,654 घरांसाठी आतापर्यंत 4,784 अर्ज
माजी मंत्री शिवाजीराव नाईक स्वगृही; हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल; भाजपला मोठा धक्का
संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

नाशिक : राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात सर्व उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट कामकाज केले आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात सर्वोत्कृष्ठ कामगिरीबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा प्रशस्तीपत्रक देवून गौरव केला.

पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना त्यांचे हक्क कर्तव्य व जबाबदा-या तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती  व्हावी यासाठी राज्य कृती आराखडयांतर्गत प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी हा कार्यक्रम शासनाच्या वतीने राबवला जातो. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा पातळीवर एकूण आठ प्रकारचे उपक्रम राबवले जातात यामध्ये जीपीडीपी व एसडीजी प्रशिक्षण, ट्रेनिंग मॅनेजमेंट सिस्टीमवरील नोंदी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे प्रशिक्षण, ग्रामसेवक प्रशिक्षण, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान निधी खर्च, ग्रामपंचायत कार्यालय निधी बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती, सीएससी कॉमन सर्विस सेंटर उद्दिष्ट पूर्ती अशा आठ उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

यासंदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांचा गौरव केला. अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

COMMENTS