बीड प्रतिनिधी - उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे शासकीय कामकाज सकाळी 10 वाजता चालू होते परंतु अधिकारी-कर्मचारी हे 12 व 1 वाजता येतात याकडे माने
बीड प्रतिनिधी – उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे शासकीय कामकाज सकाळी 10 वाजता चालू होते परंतु अधिकारी-कर्मचारी हे 12 व 1 वाजता येतात याकडे माने साहेब दुर्लक्ष करत आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिक बाहेर गावाहून येतात त्यांना ताटकळत बसावे लागते. तसेच अधिकारी आल्यानंतर खिडकीमध्ये बसत नाहीत त्यांना खिडकी मधून मोठा मोठयाने ओरडून बोलवावे लागते याचा प्रत्यक्ष मी स्वतः अनुभव घेतला आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून लायसनधारकांना उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातून लायसन डिस्पॅच झाली आहेत परंतु संबंधितांना अद्याप पर्यंत प्राप्त नाहीत. संबधित एजन्सी, पोस्ट ऑफिस, आरटीओ कार्यालयातील कर्मचारी संगनमताने लूट करत आहे. याची माहिती विचारण्यास गेल्यावर कर्मचार्यांकडून उद्धटपणे उत्तर मिळत आहे. प्रकरणी सखोल चौकशी करून लायसन धारकांना लायसन तात्काळ उपलब्द करून देण्यात यावे. आर.सी.चे काम झाले की ती पोस्टाने पाठवली जाते परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे पोस्टाने न पाठवता 500 रुपये घेऊन आर.सी. दिली जात आहे येथील आर्थिक लूट थांबविणे अतिमहत्वाचे आहे करिता वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते अजय सरवदे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत चौकशी करून कारवाई करण्याचे मागणी केली आहे.
COMMENTS