Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर फडणवीसांची निर्दोष मुक्तता

निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हा लपवल्याचा होता आरोप

नागपूर/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात त्यांच्यांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांची नोंद क

‘किशोर’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
सत्ता-संघर्षाच्या निकालाआधीच घडामोडींना वेग
उद्धव ठाकरेंना मानसोपचारांची गरज

नागपूर/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात त्यांच्यांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांची नोंद केली नव्हती. याप्रकरणी अ‍ॅड. सतीश उके यांनी तक्रार दाखल केली होती. यादरम्यान झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने फडणवीस यांना निर्दोष ठरवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला.
2014 मधील निवडणूक शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची नोंद केली नव्हती. या विरोधात वकील सतीश उके यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे नगरसेवक असताना त्यांनी एका सरकारी वकिलाविरुद्ध काही तक्रारी केल्या होत्या. त्यांना त्या खटल्यातून दूर करण्यात यावे, अशी मागणी करणारे एक प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढले होते. त्यावर त्या वकिलाने ’क्रिमिनल डिफेमेशन’ दाखल केले. नंतर त्याच वकिलांनी ते परत घेतले. या प्रकरणाची नोंद देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात केली नव्हती. यावर आक्षेप घेत वकील सतिश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. यात आणखी एका प्रकरणाचाही समावेश आहे. यातील दुसरे प्रकरण एका झोपडपट्टीवासियांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे आहे. एका जागेवर असलेल्या झोपडपट्टीला मालमत्ता कर लावण्यात यावा, असे पत्र फडणवीस यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या अधिकार्‍यांनी संबंधीत मालकाला मालमत्ता कर देखील लावला. ती जमीन खासगी असून आपल्या मालकीची आहे, अशी खासगी तक्रार एका व्यक्तीने केली होती. पुढे ही तक्रार उच्च न्यायालयाने फेटाळली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात हे दोन्ही गुन्हे नमूद केलेले नाही. त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या न्यायालयीन लढाईत हे दोन्ही गुन्हे नजरचुकीने नमूद करायचे राहिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात म्हटले होते.  

COMMENTS