Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे भाजपसोबत येतील हा विश्‍वास ः फडणवीस

मुंबई : राज्यातील महायुती मनसेला आपल्या सोबत घेण्यास इच्छूक असून, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली हो

ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
कॉंग्रेसची परिस्थिती सध्या बुडत्या जहाजासारखी
शिवरायांचे वंशज हतबल होऊच शकत नाही” 

मुंबई : राज्यातील महायुती मनसेला आपल्या सोबत घेण्यास इच्छूक असून, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली होती, तरीदेखील मनसे महायुतीसोबत सहभागी झाल्याची कोणतीही घोषणा झालेली नाही. त्याचवेळी राज ठाकरे गुढीपाडव्यानिमित्त आपली भूमिका मांडणार आहे, त्यावर बोलतांना राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना साथ देतील, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, मनसेशी काही चर्चा गेल्या काळात झाल्या आहेत. मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यापासून त्यांच्याशी काही प्रमाणात जवळीक वाढली आहे. राज ठाकरे हे पहिले असे व्यक्ती आहेत, ज्यांनी 2014 साली नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता. मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका घेतली होती. मधल्या काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. मात्र, गेल्या 10 वर्षांत ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. नव्या भारताची निर्मिती केली. राज ठाकरे यांनाही त्याची जाणीव असेल. अशा परिस्थितीत सर्वांनीच मोदींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

खडसे सोबत आल्यास स्वागतच – एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत या प्रश्‍नावर थेट उत्तर देणे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टाळले असून, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवून पक्षात कोणी प्रवेश करत असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू. या संदर्भात पक्षाने अद्याप आम्हाला माहिती दिलेली नाही. मात्र, पक्षाने या संदर्भात आम्हाला माहिती दिली तर त्यांचे देखील आम्ही स्वागतच करू, असे देखीलफडणवीस यांनी म्हटले आहे.

COMMENTS