पाटोदा : पाटोदा तालुक्यातील गितेवाडी शिवारात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटना घडली असून, पत्रकार जावेद शेख यांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवत हर

पाटोदा : पाटोदा तालुक्यातील गितेवाडी शिवारात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटना घडली असून, पत्रकार जावेद शेख यांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवत हरणाच्या अंदाजे 15 ते 20 दिवसांच्या पाडसाचे प्राण वाचवले. त्यांच्या या मानवतावादी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गितेवाडी (गितेवाडी) शिवारात जावेद शेख यांचे शेत आहे. सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यांना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र काही वेळातच त्या आवाजात वेगळेपणा जाणवल्याने त्यांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की, एक लहान हरणाचे पाडस कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते आणि कुत्र्यांनी त्याला घेरले होते. क्षणाचाही विलंब न लावता जावेद शेख यांनी धाडसाने कुत्र्यांना हुसकावून लावत पाडसाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी पाडसाला पाणी पाजून आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरक्षित ठेवले. पुढे त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनसेवक विजय जाधव, शहादेव पवार आणि पोपट पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाडसाला ताब्यात घेतले आणि आवश्यक ती पुढील कार्यवाही केली. त्यांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे पाडसाचे प्राण वाचले. या संपूर्ण घटनेमुळे जावेद शेख यांच्या संवेदनशीलता, तत्परता आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वन्यजीवांप्रती दाखवलेली ही जाणीव समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, मानवता अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण या घटनेतून दिसून येते.

COMMENTS