औंध / वार्ताहर : पारंपरिक शेती पध्दतीत बदल करणे खूप आवश्यक आहे. खटाव तालुक्यातील शेतकर्यांनी शेतीत आधुनिक व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अस

औंध / वार्ताहर : पारंपरिक शेती पध्दतीत बदल करणे खूप आवश्यक आहे. खटाव तालुक्यातील शेतकर्यांनी शेतीत आधुनिक व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन खटाव तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे यांनी केले.
गोपूज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती संदीप मांडवे, वसंत अॅग्रो इंडियाचे गिरीश देशपांडे, शिरीष काळे, स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, कृषी अधिकारी अक्षय सावंत, मोहनराव देशमुख, संतोष मांडवे, संतोष पाटील, दत्तात्रय घार्गे, बाबासाहेब घार्गे, सूर्यभान जाधव, हरिदास शिंदे, धनाजी पाटील, ओंकार खराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वाघमोडे म्हणाले, वाढते उत्पादन खर्च, बदलते हवामान आणि बाजारातील स्पर्धा लक्षात घेता शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढीसोबतच खर्चात बचत होऊ शकते. ठिबक व तुषार सिंचन, माती परीक्षणानुसार खतांचा वापर, सुधारित वाणांची निवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच यांत्रिकीकरण या बाबी शेतकर्यांनी गांभीर्याने स्वीकाराव्यात. डिजिटल शेती, मोबाईल अॅप्सद्वारे हवामानाचा अंदाज, बाजारभावाची माहिती व कृषी सल्ला घेण्यामुळे शेतकर्यांना निर्णय घेणे अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS