Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांनी शेतीपूरक व्यवसायाने आर्थिक उन्नती साधावी

लातूर प्रतिनिधी - कृषी विभागाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत विविध योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. यात बीजोत्पादन कार्

श्री अंबाबाई मंदिरात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
चीनच्या दूतावासाकडून काँग्रेसने पैसे घेतले
अंकिता-विक्कीचं लग्न धोक्यात

लातूर प्रतिनिधी – कृषी विभागाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत विविध योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. यात बीजोत्पादन कार्यक्रम, औजारे बँक, मधूमक्षिकापालन, रेशीम उद्योग, बीजप्रक्रिया उद्योग, फळप्रक्रिया उद्योग असे शेतीपूरक व्यवसाय उभारुन शेतक-यांनी आपली आर्थिक उन्नती साधली आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न घेणार्‍या लातूर तालुक्यातील बाभळगावचे प्रगतशील शेतकरी दशरथ देशमुख यांच्या रेशीम उद्योगास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी तूती लागवड, रेशीम कोष निर्मितीसाठीचे शेड, साहित्य याची पाहणी करुन कौतूक केले. याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, पोकरा योजनेतून तूती लागवड, शेड निर्मिती व साहित्य यासाठी अनूक्रमे 37,500, 126400, 56250 असे एकूण 2221100 रुपये एवढे अनूदान संबंधित शेतक-याच्या खात्यावर जमा झाले असून त्यांनी दीड वर्षात आठ वेळा कोष निर्मिती केली असून साधारणत: एका बॅचमधून 50 हजार ते 60 हजार रुपये मिळविले आहेत अशा प्रकारे आजपर्यंत चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून कूटूंबातील सर्व सदस्यांना वर्षभर रोजगार मिळतो म्हणून सर्व शेतक-यांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन केले.  याप्रसंगी लाभार्थी शेतकरी दशरथ देशमुख म्हणाले की, पोकरा योजनेतून दोन वर्षांपूर्वी तूती लागवड करून आम्ही कोष निर्मिती करू लागलो. कोष जालना, मूरूड, रामनगर येथे विक्री केली यातून चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. कूटूंबातील सर्व सदस्यांना वर्षभर रोजगार मिळाला यातून आमची आर्थिक परिस्थिती सूधारली.

COMMENTS