Homeताज्या बातम्यामनोरंजन

तामिळमधील प्रसिद्ध विनोदवीर मायिलसामी यांचे निधन

टॉलिवूडमधील अभिनेते आणि नेते नंदामुरी तारक रत्न यांच्या निधनानंतर आणखी एका अभिनेत्याच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.सा

छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग पर्व दुसरेचे सुपर सिक्सर विजेते
चाचण्याही करणे अनिवार्य
काँग्रेसच्या माजी आमदारासह तिघांवर गुन्हा दाखल | LOKNews24

टॉलिवूडमधील अभिनेते आणि नेते नंदामुरी तारक रत्न यांच्या निधनानंतर आणखी एका अभिनेत्याच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.सालिग्रामम (चेन्नई) येथे अभिनेत्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांचा आधीच मृत्यु झाल्याचे सांगितले.मायिलसामी यांच्या निधनानंतर अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच दुःख व्यक्त केले आहे. मायिलसामी सालिग्रामम येथे राहत होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी चेन्नईतील बोरूर येथील जवळच्या रुग्णालयात नेले. पण त्याआधीच त्यांना मृत्युने कवटाळले होते.

COMMENTS