Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 6 जुलैला होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नव्याने काढली जाहीरात

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा  शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजि

सागरेश्‍वरमधील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बैठक; आंदोलन स्थगित
कटरीनाला सासूबाईंची विशेष काळजी
शेतकर्‍यांना अग्रिम पीकविमा देण्यासाठी सुनावणी घ्या

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा  शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे. या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार   राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात  आली आहे.  या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी, 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्‍चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक 21 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक  24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम   दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत तर, भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 26 मे,  2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  27 मे, 2024 रोजी आहे. शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी, 2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने या मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते. आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 परीक्षेकरीता अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील   माय अकाऊॅट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्घ करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शविण्यात आलेल्या क्वेशन  या बटनावर क्लिळ करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणार्‍या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरतीप्रकिये दरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणार्‍या तसेच नव्याने अर्ज सादर करणार्‍या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्या साठी विहित अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे.

आरक्षणामुळे नव्याने अर्ज करता येणार – सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरीता अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील माय आकऊँट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक च्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील. संबंधित परीक्षेकरीता अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कार्यवाही महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मधील सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब संवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 25 जानेवारी, 2024  अशी राहील.

COMMENTS